पाण्याचा एक थेंबही न घालता बनवा कुरकुरीत 'खेकडा भजी', चव एवढी भारी की न खाणारेही खातील

Manasvi Choudhary

खेकडा भजी

खेकडा भजी हा अत्यंत प्रसिद्ध पदार्थ आहे. पावसाळ्यात मस्त गरमा गरम खेकडा भजी खाण्याची मज्जा वेगळीच असते.

Khekda Bhaji Recipe | pinterest

खेकडा भजी

खेकडा भजीमध्ये खेकडा नसतो. हा एक व्हेज पदार्थ आहे. कांद्याचे बारीक काप करून त्याची भजी बनवली जातात.

Khekda Bhaji Recipe | pinterest

साहित्य

खेकडा भजी बनवण्यासाठी कांदा, बेसन, तांदळाचे पीठ, ओवा, हळद, मसाला, हिंग, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ हे साहित्य एकत्र करा.

Khekda Bhaji Recipe

कांदा बारीक कापा

भजी बनवण्यासाठी सर्वात आधी कांदा लांब बारीक कापा त्यानंतर एका भांड्यामध्ये बेसन, तांदळाचे पीठ, ओवा, हळद, मसाला, हिंग, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ हे साहित्य मिक्स करा.

Chopped Onion | pinterest

मिश्रण एकजीव करा

संपूर्ण मिश्रण एकजीव करा आणि १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा म्हणजे मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल.

Onion | pinterest

पाणी मिक्स करू नका

मिश्रणात पाणी मिक्स करू नका. कांद्याला पाणी सुटल्याने त्यात थोडे बेसन आणि तांदळाचे पीठ मिक्स करा. पाण्याचा वापर न करता ही भजी बनवायची आहेत.

Rice flour | pinterest

फ्राय करून घ्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मिश्रणाचे छोटे छोटे गोळे फ्राय करून घ्या. भजी दोन्ही बाजूंनी कुरकुरीत फ्राय करा.

Khekda Bhaji Recipe

NEXT: पावसाळ्यात प्या हेल्दी आणि टेस्टी 4 घरगुती सूप, झटक्यात वजन होईल कमी

येथे क्लिक करा...