

गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. जळगाव-नंदुरबार मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गोरखपूर-बांद्रा साप्ताहिक एक्सप्रेस नवापूर येथे, पटना-बांद्रा सुपरफास्ट एक्सप्रेस अमळनेर येथे, तर खानदेश एक्सप्रेस नंदुरबारपर्यंतच धावणार असून पुढील प्रवास रद्द करण्यात आला आहे. अचानक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले असून रेल्वे स्थानकांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहुल गांधींसह खासदार गांधी स्मृतीस्थळी दाखल झाले आहेत. यावेळी ते राहुल गांधींनी देशातील विद्यार्थी एकटे नाहीत असे बोलत आंदोलन पुढे सुरु ठेवण्याचा इशारा दिला.
पालघर जिल्ह्याला उद्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यात उद्याही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यातील निकावली गावात लाडवी कुटुंबातील १३ सदस्य पुराच्या पाण्यामुळे घरात अडकले होते. माहिती मिळताच कासा पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत दोरी व ट्यूबच्या साहाय्याने बचावमार्ग तयार केला. पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी स्वतः पुराच्या पाण्यात उतरून बचावकार्याचे नेतृत्व केले. अखेर सर्व १३ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आंबेगाव तालुक्यात माळीणकडे जाणाऱ्या रस्त्यावर पांचाळे गावाजवळ झाड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ही घटना घडली असून ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्याची मागणी केली आहे.
दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा रायगडच्या पोलादपूरमध्ये निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालय पर्यंत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून सर्वपक्षीय नेते यांनी सुरू केला आंदोलन
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सलगरा दिवटी परिसरातील सुरू असलेल्या एका पवनचक्कीला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असतानाच दुपारच्या सुमारास पवनचक्कीतून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले.या आगीत पवनचक्कीची पातेही जळाल्याचे दिसून आले. शेतात जनावरे चारत असलेल्या शेतकऱ्यांनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणा घटनेचा तपास करत आहेत.
शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर
पुणे सत्र न्यायालयाने मंजूर केला अटकपूर्व जामीन
खलील शेख या बांधकाम ठेकेदार यांनी मागील आठवड्यात राहत्या घरात केली होती आत्महत्या
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांच्यावर झाला होता गुन्हा दाखल
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
दिल्लीत आमच्या विद्यार्थ्यांची डोकी फोडली, पोलिसांनी अमानुष मारहाण केली हे कायद्यात बसते का? आंदोलकांचा पोलिसांचा सवाल
पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची, अखेर पोलिसांनी बळजबरीने घेतले आंदोलकांना ताब्यात
कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आंदोलन सुरू केल्याने चार आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनानंतर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
आता पश्चिम बंगालच्या कोलकातामध्येही विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटी आणि मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू केले
पार्क सर्कसमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने आले एकत्र
दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वंचित आघाडीच्या बंदच्या आवाहनावर सर्व पक्षीय मोर्चात महिला आणि तरुणांचा मोठा सहभाग. भंडारा शहरात व्यापाऱ्यांनी या मोर्चाला समर्थन देताना व्यापारीपेठ बंद ठेवल्यात. भंडाऱ्यातील हुतात्मा स्मारक इथून निघेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
खाणीवाडे बंधारा आणि पांढरतारा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले असून वाहतूक ठप्प झाली आहे.
तानसा नदीपात्र तुडुंब भरल्याने नदीचे पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये शिरले आहे.
नवसई, भाताने, थळ्याचापाडा, आडणे, मेढा, कळंबोन, हत्तीपाडा, जांबुळपाडा, मडक्याचा पाडा, बुतपाडा, आंबोडे आणि भिनार या गावांचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला आहे.
अक्कलकुवाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला लागली गळती.
कार्यालयाची छत गळत असल्याने ठिकठिकाणी बादली ठेवावी लागत आहे.
पावसामुळे गळत असलेल्या कार्यालयात काम करण्याची कर्मचाऱ्यांवर वेळ.
पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथे नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन
४ तरुणांनी हातात तिरंगा घेत घोषणाबाजी करत आंदोलन केले. विविध मागण्यांसाठी त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
नाशिक -
पुनद (अर्जुन सागर) धरणातून गिरणा नदीत पाणी विसर्ग सुरू
नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस
पावसामुळे कळवण तालुक्यातील दुसरे महत्वाचे पुनद (अर्जुन सागर) धरण भरले
धरणातून 6866 क्यूसेस वेगाने पाणी गिरणा नदी पात्रात वाहत असल्याने गिरणा नदीला मोठा पूर आलाय.
नाशिक -
नांदूर-मध्यमेश्वर धरणातून ५५ हजार क्युसेस पाण्याचा विर्सग सुरू
नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे निफाडच्या नांदूरमध्यमेश्वर धरण ओव्हर फ्लो
धरणातून ५५ हजार ७७८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीला पूर
- वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज नागपूरच्या संविधान चौकात दिल्लीतील जंतर-मंतरवर तरुणांवर झालेल्या कथित लाठीमार निषेधार्त निदर्शने केली.
- वंचित बहुजन आघाडीने आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली होती
- वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नागपूरच्या संविधान चौकात जमले आणि जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांना पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली.
- हातात फलक घेतलेल्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि 'संविधान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या त्यानंतर पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले
संविधानावर विश्वास असेल तर संसदेत चर्चा करा
सरकार चर्चेला तयार असताना विरोधक पळ काढतायत
मोदी सरकारच्या काळात शैक्षणिक बजेट जास्त आहे
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज परभणी जिल्हा बंद ची हक्क देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीसह विविध सामाजिक संघटनांनी दिलेल्या बंद द्या आव्हानाला व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील बहुतांश दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली.
नेट परीक्षा पेपर फुटीनंतर विद्यार्थ्यांनी जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज झाल्याने त्याचे पडसाद आता ठाण्यात देखील उमटाणा दिसत आहेत. ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मौन आंदोलनास सुरुवात
अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील गांधी स्मारक येथे मौन आंदोलनास सुरुवात करण्यात आली
नीट पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहादा शहर बंद पुकारण्यात आला. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी झालेल्या कथित मारहाण आणि धक्काबुक्कीच्या निषेधार्थ कल्याणमध्ये काँग्रेस पक्ष आक्रमक झाला. ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली कल्याण तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
वंचित भारत बंद करणार होते, ते आम्हाला माहिती नाही. आम्ही मोर्चा काढणार आहे. तिथे राजकीय पक्षाचा झेंडा नसेल. तिथे फक्त देशाचा तिरंगा असेल. पालकांनीही या मोर्चात सहभागी व्हावे. - राज ठाकरे
मुलांसोबत चर्चा करण्यात कमीपणा काय आहे. पहिल्या दिवशीच त्यांच्यासोबत चर्चा करायला हवी होती तर ही वेळ आलीच नव्हती. राग संताप उफाळून वर आलाय. आम्ही ही वाट करून द्यायचा प्रयत्न करतो. पण काहीजण याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जातो. सिव्हिल ड्रेसवरील लोकांकडे पोलिसांकडे काठ्या कशा आल्या. त्यांची ओळख नाही. ते पाकिस्तानमधून गुंड आणले आहेत.
पोलिसांच्या वेशात गुंडानी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला
या प्रकरणात सरकार निर्दयीपणे वागतंय
विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाहीये
२६ तारखेला आम्ही एक मोर्चा, मुलांना घेऊन करायचं ठरवले आहे. मुंबईत पालक आणि मुलं एकत्र येऊन आपला राग रोष व्यक्त करत आहेत. आम्ही मोर्चा काढत आहे. शिवाजी पार्कवरून निघेल.. सिद्धीविनायकाकडे जाईल.. तिथे आम्ही साकडे घालू..
दिल्लीत पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटतायत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केलेल्या ट्विटला महत्त्व नाही
आता हा मुद्दा प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पुढे पोहोचलाय
विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होतोय
पदावर असताना जबाबदारी घ्यायला पाहिजे
दिल्लीतील आंदोलन शांततेत सुरु होतं
उद्धव ठाकरे शिवर्थावर पोहचले. थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार
सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने बदलापूर आणि वांगणी परिसराला झोडपून काढलय. काल रात्रीपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे बदलापुरात तीन ते चार वाहनांवर झाडं कोसळून वाहनांचं नुकसान झालय. तर वांगणी परिसरात अनेक घरांचे तसंच इमारतींवरील छतांचे पत्रे उडाले आहेत. सुदैवानं अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गेल्या दोन दिवसांपासून वांगणी भागातील वीजपुरवठा खंडित झालाय. मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे संपर्कही विस्कळीत झालाय.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिलीये. या दरम्यान अकोल्यात वंचितने शांतता मोर्चा काढलाय. यावेळी वंचितच्या काही कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केलाय.. यावेळी रेल्वे स्थानक ते सिंधी कॅम्प रस्त्यावरीप वाहतूक ठप्प आहे..
पुणे मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न
पुण्यातील वाकडेवाडी परिसरात केला रास्ता रोको
- गंगापूर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग आणि नदीच्या सुरू असलेल्या पावसाने गोदावरी नदीला पूर
- नाशिकच्या सोमेश्वर धबधब्याच रौद्ररूप
चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने आज श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, चोपडा येथे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत तसेच लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिर्हाईक आणि पाठ फिरवली आहे वंचित ने आज महाराष्ट्र बंदची हात गेलेले आहे त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिर्हाईक नसल्यामुळे भाजीपाला पडण्याचा आहे मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे
दिल्लीत कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेला लाठीहल्ला व त्याचा निषेध म्हणून आज वंचित ने महाराष्ट्र बंदच आवाहन केलं आहे. त्या अनुषंगाने बुलढाण्यात सकाळपासूनच वंचितच्या कार्यकर्त्यांनी गटागटाने फिरून बुलढाणा शहरातील व्यापाऱ्यांना व आस्थापनांना बंद करण्याचा आवाहन केलं आहे. सध्या बुलढाणा शहरात कडकडीत बंद असून पोलिसांनीही चौक बंदोबस्त ठेवला आहे चौका चौकात वंचित चे कार्यकर्ते असून शांततेत बंदच आवाहन करत आहेत. दरम्यान पोलिसांनी वंचित चे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केलं आहे.
-नीट’ पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील ‘जंतरमंतर’ येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने आज राज्यव्यापी बंदचे आवाहन केले असून या बंद अमरावती जिल्ह्यात देखील प्रतिसाद मिळताना दिसतो आहे, अमरावती शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे, तसेच ग्रामीण भागातील तिवसा शहर आणि दर्यापूर शहर सकाळपासून बंद आहे. या दोन्ही शहरातील सर्व दुकाने सकाळपासून बंद आहे.. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १२ वाजता भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे..
दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर लाटी चार्ज झाल्याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक.
सकाळच्या सत्रात नांदेड शहरातील दुकाने कडकडीत बंद.
नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीसह ठाकरे सेना,राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे यास समविचारी पक्ष बंद मध्ये सहभागी.
कृषी क्षेत्रात देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आता कृषी शिक्षणाच्या बाबतीत मागे पडत असल्याचे चित्र समोर आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीच्या ताज्या मानांकनात राज्यातील एकाही कृषी विद्यापीठाला पहिल्या 40 संस्थांमध्ये स्थान मिळालेले नाही. विशेष म्हणजे, यापूर्वी सातत्याने मानांकनात झळकणारे राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ यंदा यादीतून पूर्णपणे बाहेर पडले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवलीतील ओसरगांव येथे खड्डे पडलेले पाहायला मिळत आहेत. पावसाळ्यामध्ये सातत्याने एकाच ठिकाणी खड्डे पडत असतात. मात्र, महामार्ग ठेकेदार कंपनीकडून कायमस्वरूपाची उपाय केला जात नाही. केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते. सध्या पावसाळी डांबर वापरून हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही दिवसात पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते त्यामुळे ज्या भागात सातत्याने खड्डे पडतात त्या ठीकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्यात दुसऱ्यांदा पंचगंगा नदी पात्राबाहेर आली आहे.
सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 31 फूट 6 इंच इतकी झाली आहे.
जव्हार- झाप रस्ता दोन दिवसांपासून बंद
पोंढीचापाडा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने दोन दिवसांपासून 5 ग्रामपंचायतील जिल्हा परिषद शाळ आश्रम शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा संपर्क तुटला
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच
सूर्या वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
गावांमध्ये पाणी फिरायला सुरुवात
दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी चार्ज च्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी तर्फे आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली.
नाशिकच्या मनमाड मध्ये या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरून कंटेनर गेला नदीत
चिपळूणहून मुंबईच्या दिशेने जाताना दोन पुलांच्या गॅपमधून कंटेनर गेला खाली
ड्रायव्हरचा शोध सुरू
नगर पालिकेची आपत्कालीन यंत्रणा, पोलीस घटनास्थळी दाखल
ठाण्याहून मुंबईच्या दिशेने घोडबंदर रोड वरुण जाणार्या मानपाडा उड्डाण पुलावर एका कंटेनर चा अपघात झाला आहे.
चालक किरकोळ जखमी झाला आहे. कंटेनर बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.
वाशिम शहरातून सुंदर वाटीका मार्गे कोंडाळा झामरेकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. थोडासा पाऊस झाला तरी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून तो चिखलमय होतोय. परिणामी या मार्गावरील वाहतूक अनेकदा ठप्प होते. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नसल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात होत आहेत. शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पहाटे बारामतीमध्ये विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना मार्गात एका तरुणीचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
प्रसंगाचे गांभीर्य ओळखत त्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवला आणि अपघातग्रस्त तरुणीची प्रत्यक्ष जाऊन विचारपूस केली.
- सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा चांदोली खोऱ्यात व पाथरपुंज येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली
वारणा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
- नागपूरसह विदर्भातील इतर ४ जिल्ह्यांसाठी आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट
- नागपुरात मुसळधार पावसाची संततधार सुरूच राहण्याची शक्यता आहे.
- हवामान विभागाने गुरुवारी ऑरेंज अलर्ट जारी केला असून वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
डेंगूच्या रुग्णांकडून जास्त शुल्क आकारू नका महापालिकेचे खाजगी रुग्णालयांना पत्र
पावसाळ्यामुळे डेंगू च्या रुग्णात वाढ होऊ शकते त्यामुळे उपचार यावेळी आर्थिक पिळवणूक नको
तसेच रुग्णांची निदान एनएस 1 एलाएझा मॅक एलएझा या मान्यता प्राप्त चाचण्यांचा वापर करण्याचे आदेश
वसई विरार शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत
विरार पूर्वेला जोडणारा विवा मार्ग पूर्णता पाण्याखाली गेला आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांना याच साचलेल्या पाण्यातून वाट काढत ये - जा करावी लागत आहे.
पालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्या देखील साचलेल्या पाण्याचा फटका बसला आहे.
- नागपुरात मागील सात महिन्यात स्वाईन फ्ल्यूचे २५ रुग्ण आढळले त्यापैकी 1 रुग्णाचा मृत्यू झालाय.
- जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत २५ रुग्ण आढळले.२५ रुग्णांपैकी १५ रुग्ण केवळ जुलै महिन्यात आढळले त्यापैकी १३ रुग्ण महापालिका हद्दीतील..
- स्वाईन फ्ल्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभातील सर्व जिल्ह्यांना आरोग्य विभागाकडून सतर्क राहण्याच्या सूचना.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आमदारांची स्पर्धा
धाराशिवमध्ये दोन स्वतंत्र आरोग्य शिबिराच आयोजन
विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटलांचं उमरग्यात आरोग्य शिबिर, तर तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटलांच धाराशिवमध्ये
वंचित बहुजन आघाडी कडून आज महाराष्ट्र बंदची हाक
पुण्यात देखील वंचित कडून पाळण्यात येणार बंद
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या लाठीचार्ज विरोधात वंचित कडून आज महाराष्ट्र बंदची हाक
पुण्यात दुपारी १२ वाजता वंचितकडून पायी रॅलीचे आयोजन
पुण्यातील लाल महाल परिसरातून काढण्यात येणार पायी रॅली
दीर्घ प्रतीक्षेनंतर बरसलेल्या पावसामुळे पेरण्यांना पुन्हा गती मिळाली असून यवतमाळ जिल्ह्यात सात लाख हेक्टरवरील खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत.
पुढील आठ दिवसात जिल्ह्यातील संपूर्ण पेरण्या आटोपण्याची चिन्हे आहेत.
गत 24 तासात जिल्ह्यात सरासरी 38 मिमी पावसाची नोंद झाली हा पाऊस पिकांना जीवनदान देणारा ठरला आहे.
चासकमान धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर भीमा नदीत दहा हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
अशातच धरणाखालील भीमा नदीवरील पुलाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने या पुलावरून प्रवास करणारे नागरिक आणि चासकमान परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ऐन आषाढी वारीत पंढरपुरात मोठा अवैध देशीदारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
कारवाई दरम्यान 10 लाख 55 हजार रुपये किंमतीचा 155 बाॅक्स देशी दारू जप्त करण्यात आली आहे.
पालखी मार्गावरून एका टेम्पो मधून बेकायदेशीर दारूसाठ्याची वाहतूक केली जात होती.
नकाबंदीच्या ठिकाणी तपासणी केली असता अवैधदेशी दारूचा साठा मिळून आला
पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत, सध्या कोणतीही पाणीकपात नाही, महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती
सध्या शहरात कोणत्याही प्रकारची पाणीकपात करण्यात आलेली नाही
शहरातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा, पाणीपुरवठा व्यवस्था आणि वितरण यंत्रणेचा नियमित आढावा महानगरपालिकेकडून घेतला जात आहे
पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा डीपीआर तयार करण्याचे आदे
विमानतळासाठी निविदा प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश
राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल यांनी एसपीव्हीला दिले आदेश
येत्या डिसेंबरपर्यंत काम सुरू करण्याचा सरकारचा विचार
विमानतळासाठी 91% क्षेत्राच्या संपादनास शेतकऱ्यांची मान्यता
पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम सुरूच
१२ हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरींचे परवाने निलंबित
३.४८ लाख रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त
पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या सोसाट्याच्या वारासह मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय तसेच अंगणवाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.