Spicy Cheesy Maggi Recipe : साध्या मॅगीला द्या लसणाचा तडका, रेसिपीची चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Shreya Maskar

मसालेदार-चीजी मॅगी

मसालेदार-चीजी मॅगी बनवण्यासाठी मॅगी, लसूण, लाल मिरची पावडर, लिंबू, जिरे, कांदा, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, मीठ, तेल आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Spicy-cheesy Maggi | pinterest

लसूण पाकळ्या

मसालेदार-चीजी मॅगी बनवण्यासाठी सर्वप्रथम लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या, त्यात लाल मिरची घालून लिंबू पिळा.

Garlic cloves | pinterest

तेल

आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे घालून परतून घ्या. त्यानंतर तयार लसूणाचा मसाला हलका परतून घ्या. अधूनमधून ढवळत राहा, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल.

Oil | pinterest

हिरव्या मिरच्या

त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून काही मिनिटे परतून घ्या. शेवटी बारीक चिरलेले टोमॅटो घाला. सर्वकाही व्यवस्थित एकजीव करा.

green chilies | pinterest

कांदा-टोमॅटो

कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतल्यावर चवीनुसार मीठ घाला. नंतर, आवश्यकतेनुसार पाणी आणि मॅगीचे तुकडे घाला.

Onion-tomato | pinterest

चीजी

शेवटी मॅगी मसाला घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून शिजू द्या. त्यानंतर यावर मस्त तुमच्या आवडीनुसार किसलेले चीजी घाला.

cheese | pinterest

कोथिंबीर

मॅगी शिजल्यावर बारीक चिरलेल्या कोथिंबीरने सजवा. अशाप्रकारे मसालेदार-चीजी मॅगी तयार झाली आहे. पावसाळ्यात याचा मनसोक्त आनंद घ्या.

Coriander | pinterest

टीप

तुम्ही यात चिली फ्लेक्स, उकडलेल्या मक्याचे दाणे, शेजवान चटणी देखील टाकू शकता. यामुळे मॅगीची चव आणखी वाढेल.

Note | pinterest

NEXT : १ थेंबही तेल न वापरता बनवा कुरकुरीत कांदा भजी, वापरा 'ही' सिक्रेट ट्रिक

Kanda Bhaji Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...