Shreya Maskar
महाराष्ट्रात मुसाळधार पाऊस पाहायला मिळत आहे. तुम्हाला या थंडगार वातावरणात कांदा भजी खायचे असेल पण डाएटमुळे तुम्ही टाळाटाळ करत असाल तर एकदा अशा पद्धतीने एक थेंबही तेल न वापरता कुरकुरीत कांदा भजी बनवून पाहाच.
कांदा भजी बनवण्यासाठी कांदे, बेसन, ओवा, चाट मसाला, हळद, जिरेपूड, लाल तिखट, मीठ इत्यादी साहित्य लागते. कांदा भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदे सोलून धुवा. त्यानंतर कांदे लांब, पातळी चिरून घ्या.
एका बाऊलमध्ये बेसन, ओवा, मीठ, चाट मसाला, हळद, जिरे पूड आणि लाल तिखट घालून मिश्रण चांगले एकत्र करा. भजी अधिक खुसखुशीत पाहिजे असतील तर पीठात कॉर्नफ्लोअर देखील टाका.
यात चिरलेला कांदा छान घोळवून घ्या. मिश्रण खूप पातळ किंवा खूप घट्ट होणार नाही याची काळजी घ्या. पीठ तयार झाल्यावर ते काही मिनिटे बाजूला ठेवा.
आता एअर फ्रायरच्या ट्रेमध्ये बटर पेपर अंथरा त्यात छोटे छोटे कांदा भजी बनवून ठेवा. प्रथम, एअर फ्रायर २००°C वर ६ मिनिटे चालवा. नंतर भजी पलटा आणि पुन्हा एअर फ्रायर पुन्हा २००°C वर ८ मिनिटे चालवा.
अशाप्रकारे तेल न वारता कुरकुरीत कांदा भजी तयार झाले आहेत. तुम्ही कोथिंबीर चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत याचा आस्वाद घ्या.
तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही अप्पे पात्रातही खुसखुशीत कांदा भजी बनवू शकता.
कांद्याच्या पकोड्याचे पीठ खूप पातळ करू नका आणि कांद्यांना आधी मीठ घालू नका. यामुळे कांदे मऊ होतील आणि पकोडे कुरकुरीत होणार नाहीत.