Urinary Tract Infection: पावसाळ्यात वारंवार युरीन इन्फेक्शन होतंय? हा 1 देसी उपाय करेल तुमचा बचाव

Surabhi Jayashree Jagdish

बराच वेळ बसून काम कऱणं

ऑफिसमध्ये किंवा घरातून सतत तासन्तास बसून काम केल्याने शरीराची हालचाल कमी होते आणि आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पुरेसं पाणी न पिणं आणि लघवी वेळेवर न करणं यामुळे युरीन इन्फेक्शन वाढण्याची शक्यता वाढते.

UTI in women | saam tv

यूरिन इन्फेक्शनची लक्षणं

लघवी करताना जळजळ होणं, वारंवार लघवी लागणं आणि खालच्या पोटात वेदना होणं ही UTI ची सामान्य लक्षणं आहेत. काही रुग्णांमध्ये लघवीला दुर्गंधी येणं किंवा ताप येण्याचीही शक्यता असते.

UTI symptoms | saam tv

जिरं आणि ओव्याचं पाण्याचा उपाय

जिरं आणि ओवा समप्रमाणात घेऊन ते पाण्यात चांगलं उकळून घ्यावं. पाणी कोमट झाल्यावर ते हळूहळू घोट-घोट करून प्यावं. हा घरगुती उपाय काही लोकांना लक्षणांमध्ये तात्पुरता आराम देऊ शकतो.

Frequent urination | saam tv

जिरं आणि ओव्याचे फायदे

जिऱ्यामध्ये आणि ओव्यात अँटी-बॅक्टेरियल तसेच अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. त्यामुळे युरीनरी ट्रॅकमधील सूज आणि जळजळ कमी होण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते. मात्र या गुणधर्मांमुळे संसर्ग पूर्णपणे बरा होतो, असं नाही

Urinary infection | saam tv

काय लक्षात ठेवावं?

जिरं-ओव्याचं पाणी हे केवळ घरगुती उपाय म्हणूनच वापरावा. UTI हा बहुतेक वेळा बॅक्टेरियामुळे होणारा संसर्ग असल्याने अनेक रुग्णांना डॉक्टरांच्या अँटिबायोटिक्सची गरज भासू शकते. त्यामुळे फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहणं टाळावं.

Cumin water | saam tv

UTI टाळण्यासाठी काय करावं?

दिवसभरात पुरेसं पाणी पिणं आणि लघवी जास्त वेळ रोखून न ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वैयक्तिक स्वच्छता राखणं आणि सूती, सैल कपडे वापरणं इन्फेक्शनचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

Ajwain water | saam tv

डॉक्टरांकडे कधी जावं?

लक्षणं दोन दिवसांपेक्षा जास्त काळ कायम राहिल्यास किंवा ती वाढत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ताप, कंबरदुखी, लघवीत रक्त दिसणं किंवा तीव्र वेदना असल्यास त्वरित उपचार आवश्यक असतात.

UTI treatment | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Bladder infection | saam tv

Liver Cancer: लिव्हरमध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात ही 3 विचित्र लक्षणं

slow wound healing
येथे क्लिक करा