Atal Pension Yojana Saam TV
बिझनेस

Atal Pension Yojana: बजेटमध्ये खुशखबर मिळणार, अटल पेन्शन योजनेची रक्कम दुप्पट होण्याची शक्यता

Atal Pension Yojana News: अटल पेन्शन योजनेत नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पैसे दिले जातात. याआधी ५००० रुपयांपर्यंतची पेन्शन मिळत होती. मात्र, आता या पेन्शनची रक्कम वाढवली जाण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तु्म्हाला भविष्यात आर्थिक अडचण येत नाही.अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पैसे मिळतात. या योजनेत महिन्याला ५००० रुपये मिळत होते. मात्र, आता नागरिकांना १०,००० रुपयांची पेन्शन मिळू शकते. (Atal Pension Yojana)

मिडिया रिपोर्टनुसार, सरकार अटल पेन्शन योजनेत मिळणारी रक्कम वाढवण्याचा विचार करत आहे. या प्रस्तावाला मंजूरी दिली जाऊ शकते. या प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होऊ शकतो.

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, सरकार पेन्शन गॅरंटी वाढवून १०,००० रुपये करण्याची शक्यता आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आहे. याबाबत जवळपास सहमती झाली असल्याचेही सांगण्यात येत आहे. बजेटमध्ये याबाबत घोषणा होऊ शकते. या योजनेत पेन्शनची रक्कम वाढवली जाऊ शकते. या योजनेत तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पैसे मिळतात.

अटल पेन्शन योजना ही सुरक्षित योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांना आणि असंगठित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षा मिळण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत तुम्हाला ६० वर्षानंतर १,००० रुपये ते ५,००० रुपये पेन्शन दिली जाते.

या योजनेत आतापर्यंत जवळपास ५६ लाख नवीन लोक जोडले गेले आहेत. आतापर्यंत ७ कोटी लोक या योजनेत पैसे गुंतवत आहेत. या योजनेत तुम्ही जेवढी रक्कम गुंतवणार त्यावर तुम्हाला किती पेन्शन मिळणार हे ठरवले जाते. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला १,०००,२,०००,३,००० किंवा ५,००० रुपयांची गॅरंटीड पेन्शन मिळते. जर तुम्ही १८व्या वर्षी महिन्याला ४२ रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला १००० रुपयांची पेन्शन मिळेल. जर तुम्ही ४० व्या वर्षी १,४५४ रुपये महिन्याला गुंतवले तर तुम्हाला ५००० रुपये पेन्शन मिळेल. (Atal Pension Scheme)

१८ ते ४० वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे बँकेचे पासबुक असणे गरजेचे आहे. इन्कम टॅक्स भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

'भोंदूबाबामुळे पुरोगामी महाराष्ट्राची बदनामी' खरातचे पाप, सरकारच्या डोक्याला ताप

SCROLL FOR NEXT