Gold-Silver Rate Today Before Budget 2026 Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

Gold-Silver Rate Fall Today Before Budget 2026: अर्थसंकल्पाआधीच सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. एका दिवसात सोने १३००० रुपयांनी तर चांदी २७००० रुपयांनी घसरली आहे.

Siddhi Hande

अर्थसंकल्पाआधीच सोन्याचे दर घसरले

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता

Gold-Silver Rate Today: आज अर्थसंकल्पाआधीच सर्वसामान्यांसाठ दिलासदायक बातमी समोर आली आहे. आज सकाळीच सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मागच्या आठवड्याभरात सोने-चांदीच्या किंमती चांगल्याच घसरल्या होत्या. दरम्यान, आज एकाच दिवशी चांदी ३० टक्के तर सोनं १७ टक्क्यांनी घसरले आहेत.

रविवारी सकाळी शेअर मार्केट सुरु होताच मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर मार्केटसोबतच सोने-चांदीच्या किंमतीही घसरल्या आहेत. आज १ किलो चांदीच्या दरात २७००० रुपयांची घसरण झाली आहे.

मागच्या आठवड्यातही सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मागच्या आठवड्यात गुरुवारी चांदीच्या दरात सर्वाधिक वाढ झाली होती. पहिल्यांदाच चांदीचे दर ४ लाख रुपये झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चांदीचे दर १.२८ लाखांनी कमी झाले. हे दर २,९१,९२२ रुपये झाले. MCX नुसार, त्यानंतर आज चांदीचे दर ९ टक्क्यांनी घसरले आहेत. हे दर सध्या २,६५,६५२ रुपये झाले आहेत.

सोन्याचे दरही घसरले (Gold Rate Fall)

सोन्याच्या दरातदेखील घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर मागच्या आठवड्यात सर्वाधिक वाढले होते आणि मागच्याच आठवड्यात सर्वाधिक घसरले होते. सोन्याचे दर १,९३,०९६ रुपयांपर्यंत पोहचले होते. लगेच दुसऱ्या दिवशी हे दर ४२,२४७ रुपयांनी घसरुन दीड लाखांवर आले आहे. आज सोन्याचे दर ८.८० टक्क्यांन घसरले आहेत. हे दर १,३८, ६३४ रुपये झाले आहेत.

अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

अर्थसंकल्पानंतर सोने-चांदीच्या किंमती आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यानंतर आता अचानक अर्थसंकल्पाआधी दोन दिवस सोने-चांदीचे दर घसरले आहेत. त्यामुळे भविष्यातदेखील हे दर घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026 Live Updates: ५ वर्षात २० नवे जलमार्ग सुरु करणार, निर्मला सितारामन यांची घोषणा

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात किल्ला पहाण्यासाठी आलेल्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू

Cigarette Price Hike: सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्याच्या किंमतीत वाढ! एका सिगारेटसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Budget : काय स्वस्त आणि काय महाग? स्मार्टफोनपासून ते होमलोन, या १० गोष्टींकडे लक्ष

Accident News: महामार्गावर पहाटे अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT