Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केट धडाम! सेनसेक्स, निफ्टीमध्ये घसरण

Union Budget 2026 Income Tax Slabs Live Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर करणार आहेत. मध्यमवर्गीयांना प्राप्तिकर सवलत, शेतकऱ्यांसाठी नव्या योजना, रोजगारनिर्मिती आणि महागाई नियंत्रणावर सरकार कोणते निर्णय घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Budget 2026 Live Updates
Nirmala Sitharaman budget speech live updatesSaam TV Marathi

जुनी कर प्रणाली रद्द होणार? अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता

अर्थसंकल्पात टॅक्ससंदर्भात अनेक निर्णय होण्याची शक्यता आहे. यामध्ये जुनी कर प्रणाली रद्द केली जाऊ शकते. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Budget 2026 Live Updates
Budget 2026: जुनी कर प्रणाली रद्द होणार? अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता

'विकसित आणि आत्मनिर्भर भारताचा अर्थसंकल्प'; शिवराज सिंह चौहान संसदेत दाखल; 

आज संसदेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. यासाठी मंत्री शिवराज सिंह चौहान दाखल झाले आहेत.

 Budget 2026 Live Update Parliament: अर्थमंत्री निर्मला सितारामन कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी दाखल

अर्थमंत्री निर्मला सितारामन या अर्थसंकल्प सादर करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. त्याआधी आता कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये बजेटला मान्यता दिली जाणार आहे.

Nirmala Sitaraman Live Update: निर्मला सितारामन यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट

अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत दाखल झाल्या आहेत. त्यांच्या हातात बजेटची प्रत आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपती मूर्मू यांची भेट घेतली आहे. ११ वाजता त्या बजेट सादर करणार आहेत.

 Budget 2026 Live Update: अर्थसंकल्प सादर होण्याआधी शेअर मार्केटमध्ये घसरण

अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केटमध्ये घसरण झाली आहे. आज सकाळी शेअर मार्केट सुरुवात होताच 82,388.97 अंकांनी घसरण झाली आहे. शेअर मार्केट सुरु होताच एका मिनिटात  86.55 अंकांनी घसरण होऊन 82,183.23 वर व्यव्हार करत आहे.

Share Market Live Update: आज पहिल्यांदाच रविवारी शेअर मार्केट सुरु

देशाच्या अर्थसंकल्पाचा थेट परिणाम हा शेअर मार्केटवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज रविवार असतानादेखील शेअर मार्केट सुरु ठेवण्यात आले आहेत.

 Budget 2026 Live Update:  ५.४१ लाख कोटी रुपयांचे बजेट सादर होण्याची शक्यता

निर्मला सितारामन आज बजेट सादर करणार आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ५.४१ लाख कोटींचे बजेट सादर होण्याची शक्यता आहे.

Nirmala Sitaraman Budget 2026 Live Update: अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत दाखल

अर्थमंत्री निर्मला सितारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधी त्या संसदेत पोहचल्या आहेत. थोड्याच वेळात त्या २०२६-२७ साठी अर्थसंकल्प सादर करतील.

Budget 2026 Live Update Nirmala Sitaraman: निर्मला सितारामन करणार नवव्यांदा अर्थसंकल्प सादर

अर्थमंत्री निर्मला सितारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. सलग नवव्यांदा त्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Budget 2026 Silver Price Fall: चांदीची चकाकी कमी होणार? अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना गिफ्ट मिळण्याची शक्यता

चांदीचे दर गेल्या दोन दिवसांपासून कमी होत आहेत. दरम्यान, आजदेखील चांदीचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी याबाबत घोषणा होऊ शकते.

Budget 2026: सोन्याच्या किंमती कमी होणार? अर्थमंत्री मोठी घोषणा करण्याची शक्यता

आज सर्वांचेच लक्ष देशाच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काय घोषणा होतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, अर्थसंकल्पात सोने-चांदीचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत कदाचित अर्थमंत्री निर्मला सितारामन घोषणा करु शकतात.

Union Budget 2026: आज ११ वाजता अर्थसंकल्प सादर होणार

आज आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Nirmala Sitharaman budget speech live updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मांडणार देशाचा अर्थसंकल्प; 'या' क्षेत्रांकडे सर्वांचे लक्ष!

आज संपूर्ण देशाचे लक्ष राजधानीकडे लागले असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) सादर करणार आहेत. जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यासाठी सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात (Income Tax) सवलत मिळणार का, शेतीसाठी कोणत्या नव्या योजना येणार आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय पावले उचलली जाणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे. आगामी निवडणुका आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी यांवर अर्थसंकल्पात विशेष भर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Union Budget 2026: Big Expectations on Income Tax Relief, Jobs and Inflation Control

Budget 2026 Live Updates:  अर्थमंत्र्यांच्या पेटाऱ्यातून काय निघणार? राज केंद्रीय अर्थसंक्ल सादर करणार

Union Budget 2026 Income Tax Slabs Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज लोकसभेत सकाळी 11 वाजता 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करतील. दरवर्षी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा यंदाही ‘एनडीए’ सरकारने कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे साप्ताहिक सुट्टीचा दिवस असूनही अर्थसंकल्प मांडला जाणारेय. शेअर बाजारही आज खुला राहणारेय. सीतारामन यांनी सादर केलेला हा सलग नववा अर्थसंकल्प असेल. नोकरदार, सामान्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांच्या आजच्या अर्थसंकल्पावर नजरा लागल्यायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com