Gold Silver Rate  Saam TV
बिझनेस

Gold Silver Rate : धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी सोनं झालं स्वस्त; वाचा आजचा भाव किती?

Gold Silver Rate (28 October 2024) : धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी सोन्याचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे आज विविध शहरांतील किंमती काय आहेत त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्वत्र दिवाळीची लगबग आणि खरेदी सुरू आहे. उद्या धनत्रयोदशी असल्याने अनेक व्यक्तींनी सोनाराच्या दुकानात मोठी गर्दी केली आहे. दागिने खरेदीसाठी काही ठिकाणीतर नागरिकांची झुंबड जमली आहे. अशात तुम्ही धनत्रयोदशी निमित्त दागिने खरेदी करण्याचा विचार केला असेल तर आजचा दिवस देखील खास आहे. आज तुम्हाला सोनं काही प्रमाणात स्वस्त दरात मिळणार आहे. कारण आज सोन्याच्या किंमती कमी झाल्यात. चला तर मग विविध शहरांतील आजचा भाव काय आहे त्याची माहिती जाणून घेऊ.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

आज २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,३३० रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ५८,६४० रुपये आहे.

१ तोळा म्हणजे १० ग्रॅम सोन्याची किंमत आज ७३,३०० रुपये इतकी आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,३३,००० रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ४,९०० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे आज सोनं ७,९९,५०० रुपयांवर पोहचलं आहे.

१० ग्रॅम म्हणजे १ तोळा सोन्याचा भाव ७९,९५० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६३,९६० रुपये आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव ७,९९५ रुपये आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव किती?

मुंबईत - ७,९८० रुपये एक ग्रॅम

पुण्याच - ७,९८० रुपये एक ग्रॅम

जळगाव - ७,९८० रुपये एक ग्रॅम

नाशिक - ७,९८० रुपये एक ग्रॅम

नागपूर - ७,९८० रुपये एक ग्रॅम

नवी दिल्ली - ७,९९५ रुपये एक ग्रॅम

पटना - ७,९८५ रुपये एक ग्रॅम

लखनऊ - - ७,९९५ रुपये एक ग्रॅम

चांदीचा भाव काय?

आज विविध शहरांतील चांदीचा भाव काय याची देखील माहिती जाणून घेणार आहोत. काही दिवसांपूर्वी चांदीचा भाव लाखांच्या घरात पोहचला होता. तर आता चांदीची किंमत कमी झाली आहे. शनिवारी चांदी स्वस्त झाल्यानंतर आज दरात कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा भाव ९८,००० रुपये प्रति किलो आहे. मुंबईसह राज्यातील आणि देशभरातील विविध शहरांत चांदीचा भाव हाच कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; बॉम्बे हायकोर्टासह अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यालाही लक्ष्य

BDD Homes : बीडीडी चाळीतील रहिवाशांचे घराचे स्वप्न पूर्ण; ५५७ कुटुंबांना मिळाली हक्काची घरे

Soap Hacks : उरलेला साबण फेकून देताय? घरातील कामांसाठी असा करा पुनर्वापर

Skin Care: चेहऱ्यावरील काळे डाग होतील कायमचे कमी! करा हे सोपे आणि फायदेशीर घरगुती उपाय, चेहरा होईल ग्लोईंग

EPF New Rules 2026: नोकरदारांसाठी खूशखबर! पीएफच्या नियमात मोठा बदल; आता २५ हजार रुपयांपर्यंतच्या पगारावर मिळणार मोठा फायदा, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT