Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Gold Silver Price Hike Today: रोज सोने-चांदीच्या नवीन किंमती जाहीर होत असतात. आज सोन्याचे भाव वाढले आहेत.
Gold Silver Price
Gold Silver PriceSaam Tv
Published On

सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. येत्या १० दिवसात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. दिवाळीत अनेकजण नवनवीन वस्तू खरेदी करतात. त्यात अनेकजण सोने-चांदी खरेदी करतात. सोने-चांदीच्या किंमती गेल्या अनेक दिवसांपासून वाढत आहे.

जर तुम्हीही सणासुदीला सोने-चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही दर चेक करा. आज सोन्याच्या किंमती खूप वाढल्या आहेत. १ तोळा सोने जवळपास ७८ हजार रुपये आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार असल्याचे दिसत आहे.

Gold Silver Price
Atal Pension Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५००० रुपयांची पेन्शन मिळवा; सरकारची अटल पेन्शन योजना नक्की आहे तरी काय?

२४ कॅरेट सोने

आज १ ग्रॅम सोने ७.८९८ रुपयांवर विकले जात आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६३,१८४ रुपये आहे. १० ग्रॅम म्हणजेच एका तोळ्याची किंमत ७८,९८० रुपये आहे.सोन्याच्या किंमती आज गगनाला भिडल्या आहेत.

२२ कॅरेट सोन्याच्या किंमती

१ ग्रॅम सोन्याची किंमत ७,२४० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५७,९२० रुपये आहे तर १० ग्रॅम सोने ७२,४०० रुपयांवर विकले जात आहे. १०० ग्रॅम सोने ७,२४,००० रुपयांवर विकले जात आहे.

१८ कॅरेट सोन्याची किंमत

आज १ ग्रॅम सोने ५,९२४ रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४७,३२९ रुपये आहे. तर १० ग्रॅम सोन्याची किंमत ५९,२४० रुपये आहे. १०० ग्रॅम सोने ५,९२,४०० रुपयांवर विकले जात आहे.

Gold Silver Price
PM Internship Scheme : ९०,८०० पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी, आजपासून नोंदणी सुरू; कुठे आणि कसा कराल अर्ज, वाचा सविस्तर

चांदीची किंमत

आज ८ ग्रॅम चांदीची किंमत ७९२ रुपये आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ९९० रुपये आहे. १०० ग्रॅम चांदी ९,९०० रुपयांवर विकली जात आहे. आज चांदीच्या किंमतीत २०० रुपयांनी वाढ झाली आहे.

सध्या सणासुदीचे दिवस आहेत.त्यात दिवाळीत सोने खरेदी करणे चांगले असते, असं म्हटलं जातं. त्यामुळे अनेकजण सोने-खरेदी करतात. जर तुम्हालाही सोने-चांदी खरेदी करायची असतील तर दर चेक करुन जा.

Gold Silver Price
APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com