Modi Government Decision: सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट, मोहरी आणि गव्हाच्या MSPमध्ये भरघोस वाढ

Wheat MSP : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट देताना सरकारने सहा रब्बी पिकांसाठी नवीन किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर केली. यामध्ये मोहरी आणि गव्हाच्या एमएसपीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
Modi Government Decision: सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट, मोहरी आणि गव्हाच्या MSPमध्ये भरघोस वाढ
Published On

देशातील करोडो शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिवाळी भेट दिलीय. ऐनसणासुदीच्या काळाआधी केंद्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. सरकारने या बैठकीत सहा रब्बी पिकांच्या एमएसपीत मोठी वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सरकार यासाठी ८७,६५७ कोटी रुपये खर्च करणार आहे. रब्बी हंगामातील ६ पिकांना म्हणजेच गव्हू, हरभरा, मसूर, मोहरी, जव आणि सूर्यफूलच्या बियांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याची घोषणा सरकारने केलीय.

मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, नवीन एमएसपी दरांमध्ये गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता हा नवीन दर २,४२५ रुपये प्रति क्विंटल असेल. त्याचप्रमाणे मोहरीच्या एमएसपीमध्ये ३०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता त्याचा नवीन खरेदी दर ५,९५० रुपये प्रति क्विंटल असेल. सरकार शेतकऱ्यांकडून या किमान किमतीवर शेतमालांची खरेदी करत असते. त्याला किमान आधारभूत किमत म्हटलं जातं.

बाजारात या पिकांचे दर सरकारच्या एमएसपीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकतात. एमएसपी थेट पिकांच्या सरकारी खरेदीशी संबंधित आहे. देशात अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादने खरेदी करते आणि नंतर ते सरकारी गोदामांमध्ये साठवत असते.

Modi Government Decision: सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट, मोहरी आणि गव्हाच्या MSPमध्ये भरघोस वाढ
Pulses MSP: सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार; उडीद आणि तूर डाळीचा एमएसपी वाढ होण्याची शक्यता

आता नवीन एमएसपी दरांमध्ये, बार्लीच्या दरात १३० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचा नवीन दर १,९८० रुपये प्रति क्विंटल असेल. त्याचप्रमाणे हरभरा (देशी) च्या एमएसपीमध्ये २१० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे आणि त्याचा नवीन दर ५,६५० रुपये प्रति क्विंटल असेल. सरकारने मसूरच्या दरात २७५ रुपये वाढवण्यात आलीय. एमएसपी दरात ६,७०० प्रति क्किटल आहे. तर तीळ आणि सूर्यफूलाच्या बियाच्या दरात १४० रुपयांची वाढ करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com