Silver Rate Today : चांदीचा भाव १ लाखांच्या पुढे; गगनाला भिडलेले तुमच्या शहरातील दर वाचले का?

Gold Silver Rate Today Mumbai : १० ग्रॅम सोन्याचा भाव ७९,७९० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ६३,८३२ रुपये आहे. तसेच १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,९७९ रुपये इतका आहे.
Gold Silver Rate Today Mumbai
Silver Rate TodaySaam TV
Published On

सणासुदीच्या काळात प्रत्येक व्यक्ती घरात थोडं का होईना सोनं खरेदी करतात. महागाईचा भडका उडालेला असताना आता सोन्याच्या भावानेही जोरदार उसळी घेतली आहे. सोने-चांदीचा भाव दररोज बदलत आहे. अशात आज प्रति किलो चांदीचा आणि १ तोळा सोन्याचा भाव काय आहे? तसेच विविध शहरांत यांच्या किंमती किती? याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

Gold Silver Rate Today Mumbai
Gold-Silver Rate : गणेशोत्सवाआधीच घसरला सोने-चांदीचा भाव; खरेदी करण्याआधी वाचा तुमच्या शहरातील ताज्या किंमती

आज सकाळी जाहीर झालेल्या दरांनुसार, १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,९७,९०० रुपये इतका आहे. तर १० ग्रॅम सोन्याचा भाव ७९,७९० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ६३,८३२ रुपये आहे. तसेच १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,९७९ रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,९८,५०० रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ५९,८५० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ४७,८८० रुपये आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव ५,९८५ रुपये इतका आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज ७,३१५ रुपयांना विकलं जात आहे.

८ ग्रॅम सोनं ५८,५२० रुपयांवर आहे.

१० ग्रॅम सोनं आज ७३,१५० रुपये इतकं आहे.

१०० ग्रॅम सोनं ७, ३१, ५०० रुपयांवर पोहचलं आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याच्या किंमती

मुंबईमध्ये आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,९६४ रुपये आहे.

पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३०० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,९६४ रुपये इतका आहे.

जळगाव २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३०० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,९६४ रुपये इतका आहे.

नाशिक आणि नागपूरमध्ये देखील २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३०० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,९६४ रुपये इतका आहे.

चांदीचा भाव काय?

चांदीच्या किंमतीने आज मोठी उसळी घेतली आहे. चांदीचा भाव थेट १ लाखाच्या पुढे पोहचला आहे. एक किलो चांदीचा आजचा भाव १,०२,००० इतका आहे. तर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या विविध शहरांत आज चांदी याच किंमतीने विकली जात आहे.

Gold Silver Rate Today Mumbai
Gold Silver Rate : दसऱ्याच्या आधीच सोनं झालं स्वस्त; आजचा भाव वाचला का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com