Gold Silver Rate In Maharashtra (15th August): भारतात लोक गुंतवणूक करताना सर्वात आधी सोने चांदीला प्राधान्य देतात. सोने चांदीत गुंतवणूक करणे ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक असल्याचे मानले जाते. कालच्या तुलनेत सोन्याच्या भावात काही बदल झाले नाहीत. परंतु चांदीचे भाव मात्र घसरले आहेत.
जुलै महिन्यात सोन्या चांदीच्या भावात वाढ होती. परंतु ऑगस्ट महिन्यात सोन्या चांदीचे भाव घसरले आहेत. या भावात सतत चढउतार होताना दिसत आहे
२२ कॅरेटच्या एक ग्रॅम सोन्याचे भाव ५४६५ रुपये तर, आठ ग्रॅम सोन्याची किमत ४३,७२० आहे. ग्राहकांना २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्यासाठी ५४,६५० रुपये तर १०० ग्रॅम सोन्यासाठी ५,४६,५०० रुपये द्यावे लागतील.
अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची १० ग्रॅमनुसार ५४,७०० किमत आहे तर २४ कॅरेटची ५९,६७० किमत आहे. बंगळुरु, हैदराबाद, कोलकत्ता, मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किमती ५४,६५० तर २४ कॅरेटच्या ५९,६२० किमत आहे. चैन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किमत ५४,९५० रुपये तर २४ कॅरेटची ५९,९५० रुपये किमत आहे. दिल्लीत २२ कॅरेटच्या सोन्याची किमत ५४,८०० तर २४ कॅरेटची ५९,७६० रुपये आहे.
चांदीचा भाव
चांदीचा दर कालच्या तुलनेत ३,४० प्रति ग्रॅमने घसरला आहे .एक ग्रॅम चांदीची किंमत ७२.८० रुपये आहे. तर आठ ग्रॅम चांदीची किमत ५८२.४० आहे. १० ग्रॅम चांदी ७२८ रुपये तर १०० ग्रॅम चांदीची किमत ७२८० रुपये आहे.
अहमदाबाद ,दिल्ली, कोलकत्ता आणि मुंबईत चांदीच्या किमती सारख्याच आहे. चांदीची किमत ७२८ रुपये आहे. तर बंगळूरुमध्ये ७१५ रुपये किमत आहे. चैन्नई, हैदराबादमध्ये ७६० रुपये भाव आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.