Petrol Diesel Price (15th August): राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ ; वाचा तुमच्या शहरातील नवीन दर

Petrol Diesel News : कालच्या तुलनेत आजचे कच्च्या तेलाचे भाव जवळपास स्थिर आहेत.
Petrol Diesel Prices On 15 August
Petrol Diesel Prices On 15 AugustSaam TV
Published On

Petrol Diesel Price Today 15th August 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढअतार होत असतात. कालच्या तुलनेत आजचे कच्च्या तेलाचे भाव जवाळपास स्थिर आहेत. डब्ल्यूटीआय क्रूड ०.०१ डॉलरने घसरले आहेत. प्रति बॅरल ८२.४१ डॉलर वर विकले जात आहे. तर ब्रेंट क्रूड ०.०६ डॉलरने ने घसरून ८६.१४ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार होत आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाचे दर जाहीर केले जातात.

सरकारी कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार , काही ठिकाणी पेट्रेल डिझेलचे भाव वाढलेत तर काही ठिकाणी कमी झालेत. गुजरातमध्ये पेट्रोल ६३ पैसे तर डिझेल ६४ पैशांनी महागले आहे. महाराष्ट्रात पेट्रोल ८९ पैशांनी तर डिझेल ८६ पैशांनी महाग झाले आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली आहे.

दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल ४४ पैशांनी तर डिझेल ४१ पैशांनी स्वस्त झाले आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल ३४ पैशांनी तर डिझेल ३१ पैशांनी स्वस्त झालं आहे. मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्येही भाव कमी झाले आहेत.

Petrol Diesel Prices On 15 August
Bank FD Schemes Updated (Aug 2023) : बँकेत एफडी करण्याचा विचार करताय? हीच ती योग्य वेळ!

चार महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे. कोलकत्त्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १४२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर आहे.

या शहरांमध्ये किंमती किती बदलल्या

नोएडामध्ये पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर गाझियाबादमध्ये ९६.५८ रुपये आणि डिझेल ८९.७५ रुपये प्रति लिटर आहे. लखनऊमध्ये पेट्रोल ९६.४७ रुपये आणि डिझेल ८९.६६रुपये प्रतिलिटर झाले आहे. पाटण्यात पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०९ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर झाले आहे.

Petrol Diesel Prices On 15 August
Pulses Rate Increase: आधी टोमॅटो लालबूंद, आता चणाही टम्म फुगला; महागाईनं बिच्चारी जनता बेजार

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर असे तपासा?

शहर आणि राज्यानुसार पेट्रोल-डिझेलच्या किमती निश्चित केल्या जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या शहराची नवीनतम किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही एसएमएसद्वारेच तपासू शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी RSP<deलर कोड> लिहा आणि ९२२४९९२२४९ वर मेसेज पाठवा.

तर, BPCL ग्राहकांना डीलर कोड> 9223112222 नंबरवर पाठवावा लागेल आणि HPCL ग्राहकांना HPPRICE <डीलर कोड> 9222201122 क्रमांकावर पाठवावा लागेल. यानंतर, काही मिनिटांत कंपनी तुम्हाला शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर पाठवेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com