Gold Silver Price Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price: दिवाळीपूर्वी सोन्याला झळाळी, किंमती गगनाला भिडल्या; सोनं ८०,००० पार तर चांदी स्थिरावली; वाचा आजच्या किंमती

Gold Silver Price Hike Today: दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचे दर ८०,००० वर विकले जात आहे. सोन्याचे दर वाढले असले तरी चांदीच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.

Siddhi Hande

दिवाळी सुरु व्हायला अवघे काही दिवस उरले आहे. दिवाळीच्या शुभ मूहूर्तावर सोने घेणं चांगलं असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे अनेकजण सोने खरेदी करतात. दिवाळीला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी भाव चेक करा. सोने-चांदीच्या किंमतीने आज उच्चांक गाठला आहे. आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ८०,००० झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे. दिवाळीआधीच सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने खरेदीदारांच्या खिशाला फटका बसणार आहे. दिवाळीच्या शूभमूहूर्तावर सोने खरेदी करत असाल तर भाव चेक करा. (Gold Silver Price Today)

२४ कॅरेट सोन्याचे भाव (Gold Rate)

आज १ तोळा सोने ८०,२९० रुपयांवर विकले जात आहे. काल १ तोळा सोन्याची किंमत ७९,५८० रुपये आहे. सोन्याच्या दरात ७१० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६४,२३२ रुपये आहे.तर १ ग्रॅम सोन्याची किंमत ८,०२९ रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याची किंमत

१ तोळा सोन्याची किंमत ७३,६०० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ६५० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५८,८८० रुपये आहे. १ ग्रॅम सोन्याची किंमत ७,३६० रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याची किंमत

१ तोळा सोन्याची किंमत ६९,२२० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४८,१७६ रुपये आहे. १ ग्रॅम सोन्याची किंमत ६,०२२ रुपये आहे.

चांदीची किंमत (Silver Rate)

आज चांदीच्या किंमती मात्र स्थिर आहेत. चांदीच्या किंमतीत ना वाढ झाली ना चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. आज ८ ग्रॅम चांदी ७८४ रुपयांवर विकली जात आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ९८० रुपये आहे.१०० ग्रॅम चांदीची किंमत ९,८०० रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jowariche Dhirde: नाश्त्याला बनवा ज्वारीच्या पिठाचे चटपटीत धिरडे; झटपट होणारी रेसिपी लगेच करा ट्राय

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

पहाटे काळाने घाला घातला! त्याची कार थेट कालव्यात गेली, पत्नी अन् सासू-सासऱ्याचा डोळ्यासमोर मृत्यू

8th Pay Commission: सॅलरी,रजा आणि पेन्शन...आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या

Lalit Prabhakar: प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता महिनाभर अंथरुणाला खिळून होता, नेमकं काय झालं होतं?

SCROLL FOR NEXT