Tulja Bhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरात साडेसहा कोटी जमा; नवरात्र उत्सवात ७०० ग्रॅम सोने, १६ किलो चांदीही अर्पण

Dharashiv News : यंदा ३ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सव पार पडला. या कालावधीत तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातुन भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल
Tulja Bhavani Mandir
Tulja Bhavani MandirSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या चरणी लिन होण्यासाठी नवरात्रोत्सवात लाखो भाविक गेले होते. दर्शन घेऊन भाविकांनी रोख रकमेसह दागिन्यांचे देखील भरभरून दान दिले आहे. या काळात मंदिरात सुमारे साडेसहा कोटी रुपये दानपेटीत जमा झाले आहेत. 

यंदा ३ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सव (Navratri Festival) पार पडला. या कालावधीत तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातुन भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल झाले होते. (Tulja Bhavani Mandir) तुळजाभवानी मातेच्या नुकत्याच पार पडलेल्या शारदीय नवरात्र उत्सवात मंदीर संस्थानला दर्शनपाससह वेगवेगळ्या स्वरूपात ६ कोटी १ लाख रुपये तर सोन्या चांदीच्या माध्यमातून ६५ लाख असे एकुण ६ कोटी ६६ लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न प्राप्त झाले आहे. 

Tulja Bhavani Mandir
Hingoli Vidhan Sabha : हिंगोली विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर; बंडखोरीची शक्यता

मंदिरात आलेल्या भाविकांकडून देणगी दर्शन पास, सिंहासनपेटी, इतर दानपेटी, विश्वस्त निधी पेटी, देणगी दर्शन युपीआए, ऑनलाईन दर्शन, अभिषेक पुजा, मनीऑर्डर देणगी, चेकद्वारे देणगी, फोटो विक्री, रोख रक्कम अर्पण आदी माध्यामातून हे उत्पन्न प्राप्त झाले आहे. याशिवाय काही भक्तांनी सोने व चांदीचे आभूषण देखील अर्पण केले असून साधारण ७०० ग्रॅम सोने व १६ चांदी अर्पण करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com