Gold Silver Price Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price: दिवाळीपूर्वीच सोने-चांदीच्या किंमतीत वाढ; १ तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या

Gold Silver Price Today 19th October 2024: आज सोने-चांदीचे नवे दर जाहीर झाले आहेत. सोने चांदीच्या किंमतीत आजही वाढ झालेली आहे. दिवाळीच्या आधी सोने-चांदीत अशीच वाढ सुरु राहिली तर खरेदीदारांच्या खिशाला चांगला फटका बसणार आहे.

Siddhi Hande

दिवाळी अवघ्या दहा दिवसांवर आली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकजण सोने-चांदी खरेदी करतात. सोने-चांदीच्या किंमती गेल्या अनेक दिवसांपासून वाढत आहे.सोने-चांदीच्या वाढत्या किंमतींमुळे खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे.

सणासुदीच्या दिवसात सोने-खरेदी करणे शुभ मानले जाते. विशेषतः दिपावली पाडव्याला जास्त प्रमाणात सोने-खरेदी केले जाते. आज १ तोळा सोन्याची किंमत ७८,९९० रुपये आहे. सोन्याच्या किंमतीत अशीच वाढ झाली तर दिवाळीला खरेदीदारांच्या खिशाला फटका बसणार आहे.चला तर मग जाणून घेऊया सोने-चांदीचे भाव

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती

आज २४ कॅरेट १ ग्रॅम सोने ७,८९९ रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६३,१९२ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ७८,९९० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ७,८९,९०० रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याची किंमत

१ कॅरेट सोन्याची किंमत ७,२४१ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५७,९२८ रुपये आहे. १ तोळा सोन्याची किंमत ७२,४१० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ७,२४,१०० रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याची किंमत

१ ग्रॅम सोन्याची किंमत ५,९२५ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४७,४०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ५९,२५० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ५,९२,५०० रुपये आहे.

चांदीचे भाव

आज ८ ग्रॅम चांदी ७२९.८० रुपयांवर विकली जात आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ९९१ रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,९१० रुपये आहे. कालच्या तुलनेत आज सोने-चांदीच्या भावात फारसा बदल झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

SCROLL FOR NEXT