Gold-Silver Price  Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Sunday: युद्धामुळे सोने-चांदीचे दर कडाडले; वाचा मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील नवे दर

Gold Silver Prices Hike (8th October): जागतिक बाजारपेठेत सोने-चांदीच्या दरांनी मोठी उसळी घेतलीये.

Ruchika Jadhav

Sona Chandi Rate:

गाझा येथून शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ला केला. यामुळे प्रत्युत्तरात इस्त्रायलने युद्धाची घोषणा केली आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत सोने-चांदीच्या दरांनी मोठी उसळी घेतलीये. सराफा बाजारातून आजचे सोने-चांदीचे दर जाहीर करण्यात आलेत. त्यानुसार २४ कॅरेट सोन्याचे दर ५७,५४० रुपयांवर पोहचलेत. (Latest Marathi News)

सोन्याचे दर कितीने वाढले?

सोन्याच्या दरांनी आज मोठी उच्चांकी गाठलीये. २४ कॅरेट १ तोळा सोन्याची किंमत ३१० रुपयांनी वाढलीये. त्यानुसार प्रति तोळा सोन्याचे दर ५७,६९० रुपयांवर पोहचलेत. २२ कॅरेट सोन्याचे दरांत २५० रुपयांनी वाढ झालीये. त्यानुसार प्रति तोळा सोन्याची किंमत ५२,९०० रुपये प्रति तोळा आहे.

प्रमुख महानगरांमधील सोन्याच्या किंमती

मुंबईत २४ कॅरेट सोनं ५७,५४० रुपये प्रति तोळा आणि २२ कॅरेट सोनं ५२,७५० रुपये प्रति तोळा आहे. चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोनं ५८,५८० रुपये प्रति तोळा आणि २२ कॅरेट सोनं ५३,७०० रुपये प्रति तोळा आहे. नवी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोनं ५८,६९० रुपये प्रति तोळा आणि २२ कॅरेट सोनं ५२,९०० रुपये प्रति तोळा आहे. कोलकत्तामध्ये २४ कॅरेट सोनं ५७,५४० रुपये प्रति तोळा आणि २२ कॅरेट सोनं ५२,७५० रुपये प्रति तोळा आहे.

चांदीचे दर कितीने वाढले?

युद्धामुळे चांदीच्या दरांमध्येही मोठी वाढ झालीये. चांदीचे दर १,५०० रुपये प्रति किलो मागे वाढले आहे. त्यामुळे चांदीचे ७२,१०० रुपये प्रति किलोवर पोहचलीये. मुंबईत चांदी ७२१००.०० रुपये प्रति किलो आहे. पुण्यात प्रति किलो चांदीचे दर ७२१००.०० रुपये किलो आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

SCROLL FOR NEXT