Ganeshutsav Gold Silver Price Hike saam tv
बिझनेस

Gold Silver Price : गणेश चतुर्थीआधी ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका, सोनेचांदीचा भाव लाखाच्या पार

Gold Silver Price Hike : मागील पाच दिवसात सोन्याचांदीच्या दरात वाढ झाली आहे. गणेशोत्सवाच्या एक दिवसआधी सोन्यासह चांदीचा भाव एक लाखाच्या पार गेल्याचे पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

  • गणेशोत्सवाच्या आधी सोन्या-चांदीच्या दरात तब्बल २,५०० रुपयांची वाढ होऊन भाव लाखाच्या पार गेले आहेत.

  • जळगाव सुवर्णनगरीत २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह १ लाख ३ हजार रुपयांवर पोहोचला आहे.

  • चांदीचे दरही वाढून जीएसटीसह १ लाख २१ हजार रुपयांवर गेले असून खरेदीवर परिणाम होत आहे.

संजय महाजन, साम टीव्ही, प्रतिनिधी

Gold Silver Price Hike : गणेशोत्सवाला उद्या (२७ ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. गणेश चतुर्थीच्या आधी सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या भावामध्ये प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या वेळी दरात वाढ झाल्याने खरेदीवर परिणाम झाल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या आधी ५ दिवसात सोन्या-चांदीच्या भावात प्रत्येकी २,५०० रुपयांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. आज (२६ ऑगस्ट) गणेशोत्सवाच्या एक दिवस अगोदर जीएसटी विना सोन्याचा भाव एक लाख रुपयांच्या पार गेला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दरामध्ये वाढ झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

जळगाव सुवर्णनगरीमध्ये जीएसटी विना २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ८०० रुपयांवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्याव्यतिरिक्त जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचे भाव १ लाख ३ हजार ८२४ रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटी विना २२ कॅरेट सोन्याचे भाव ९२ हजार ३३० रुपयांवर आणि जीएसटीसह २२ कॅरेट सोन्याचे भाव ९५ हजार ९९ रुपयांवर गेले आहेत.

सोन्याप्रमाणे जळगाव सुवर्णनगरीत चांदीच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. अगदी सोन्याप्रमाणेच चांदीचे भावही एक लाख रुपयांच्या वर गेल्याची माहिती समोर आली आहे. चांदीचे भाव जीएसटी विना १ लाख १७ हजार ५०० रुपयांवर गेले आहेत. तर जीएसटीसह चांदीचे भाव १ लाख २१ हजार ३० रुपयांवर पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune School: शिक्षणाचा बाजार मांडलाय यांनी...फी न भरल्यानं शाळेनं विद्यार्थ्यांचे फोटो केले व्हायरल | VIDEO

Dharashiv: स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटात तुफान राडा, दगडफेकीत ५ पोलिस जखमी; पाहा VIDEO

Team India : भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! गंभीरनंतर आता धोनीवर ऑलराउंडरचा धक्कादायक आरोप

CIBIL Score Update : CIBIL स्कोअर नसेल तरी कर्ज मंजूर! जाणून घ्या नियम

Chocolate Modak Recipe : गणपतीसाठी खास बनवा चॉकलेट मोदक, बाप्पासोबतच मुलेही होतील खुश

SCROLL FOR NEXT