Virat Kohli Haris Rauf Ind Vs Pak
Virat Kohli Haris Rauf Ind Vs Pakx

विराट कोहलीनं चोपलं, तरीही अक्कल नाही आली... पाकिस्तानी गोलंदाज म्हणतो, Asia Cup मध्ये भारताला हरवू

Haris Rauf Viral Video Ind vs Pak : सोशल मीडियावर पाकिस्तानचा गोलंदाज हरिफ रौफचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याने आशिया कपमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तान सामने जिंकण्याचा दावा केला आहे.
Published on
Summary
  • आशिया कप २०२५ मध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाणार आहे.

  • त्याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • रौफने भारताविरुद्धचे दोन्ही सामने पाकिस्तान जिंकेल असा दावा रौफने केला आहे.

Asia Cup 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत. ९ सप्टेंबर रोजी सुरु होणाऱ्या आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हरिफ रौफचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रौफने पाकिस्तानच्या भारताविरुद्ध विजयाने दावा केला आहे.

आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे स्पर्धेत ते १४ सप्टेंबर रोजी आमनेसामने खेळणार आहेत. जर दोन्ही संघ पुढील फेरीत पोहोचले, तर पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळेल. हरिफ रौफला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांबद्दल विचारण्यात आले, त्यावर त्याने 'दोन्ही सामने पाकिस्तान जिंकेल', असे वक्तव्य केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

Virat Kohli Haris Rauf Ind Vs Pak
ED Raid : ईडीने धाड टाकली, आमदार भिंतीवरून उडी मारून पळाला

भारतासह पाकिस्तानने देखील आशिया कपसाठी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवकडे भारताच्या संघाचे कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर सलमान आगा पाकिस्तानी संघाचे नेतृत्त्व करणार आहे. भारतीय संघात यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर यांना संधी मिळाली नाही, तर पाकिस्तानच्या संघात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना वगळण्यात आले आहे.

Virat Kohli Haris Rauf Ind Vs Pak
Actor Death : KGF चित्रपटातील अभिनेत्याचे निधन, वयाच्या ५५ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

आशिया कपमध्ये भारताने सर्वाधिकवेळा विजेतेपद मिळवले आहे. आठ वेळा भारतीय संघाने आशिया कप जिंकला आहे. भारताचा संघ गतविजेता संघ देखील आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारताने २०२३ मध्ये श्रीलंकेमध्ये आशिया कप जिंकला होता. हा शेवटचा एकदिवसीय स्वरुपात खेळला गेलेला आशिया कप होता. यावेळी ही स्पर्धी टी-२० स्वरूपात खेळली जाणार आहे.

Virat Kohli Haris Rauf Ind Vs Pak
Russia Ukraine : युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी रशियावर हल्ला, ड्रोन हल्ल्यांमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com