
युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी रशियावर मोठा ड्रोन हल्ला झाला असून कुर्स्क अणुऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले.
या हल्ल्यांमुळे अणुभट्टी क्रमांक-३ ची कार्यक्षमता ५० टक्क्यांनी घटली, तर उस्त-लुगा इंधन टर्मिनलमध्ये भीषण आग लागली.
रशियाने १२ हून अधिक प्रदेशांत ९५ युक्रेनियन ड्रोन पाडल्याचा दावा केला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Russia Ukraine News : युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी रशियावर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. हे हल्ले युक्रेनने केल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यांमुळे रशियाच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेल्या कुर्स्क अणुऊर्जा प्रकल्पाच्या अणुभट्टी क्षमतेमध्ये मोठी घट झाली. याशिवाय प्रमुख उस्त-लुगा इंधन निर्यात टर्मिनलमध्ये मोठी आग लागली.
रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (२४ ऑगस्ट) १२ हून अधिक रशियन प्रदेशांमध्ये ९५ युक्रेनियन ड्रोन पाडण्यात आले. १९९१ मध्ये युक्रेन सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्याच्या घोषणेचा वर्धापन दिन साजरा करताना हा हल्ला झाला. कुर्स्क अणुऊर्जा प्रकल्पाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने एक ड्रोन नष्ट केला. पण त्याच्या स्फोटामुळे ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाली आणि अणुभट्टी क्रमांक-३ ची कार्यक्षमता ५० टक्क्यांनी कमी झाली.
कुर्स्क अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्लांट प्रशासनाने घटनेची माहिती दिली. रेडिएशनची पातळी सामान्य आहे. ड्रोन हल्ल्यामुळे लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन रिॲक्टर सध्या वीजनिर्मिती करत नसून एका रिॲक्टरची दुरुस्ती सुरु आहे. या हल्ल्यादरम्यान रशियाच्या उत्तर लेनिनग्राड प्रदेशातील उस्ट-लुगा बंदरावर किमान १० युक्रेनियन ड्रोन पाडण्यात आले. त्यांच्या ढिगाऱ्यामुळे नोव्हाटेक-संचालित इंधन निर्यात आणि प्रक्रिया टर्मिनलमध्ये आग लागली.
रशियाच्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एक ड्रोन थेट इंधन टर्मिनलकडे जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर आकाशात आगीचा एक मोठा गोळा तयार झाला आणि काळ्या धुराचे ढग पसरत गेले. या घटनेनंतर अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा आगीवर नियत्रंण मिळवण्याच्या कामाला सुरुवात केली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे लेनिनग्राड प्रदेशाचे गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोज्डेन्को यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.