Maharashtra Politics : मोठी राजकीय घडामोड! भाजपला शिंदे गट जोरदार धक्का देणार?

Maharashtra Political News : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून भारतीय जनता पक्षाला धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On
Summary
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

  • नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट स्वबळाची चाचपणी करत असून दादा भुसे यांनी प्रत्येक जागेसाठी तयारीचे आदेश दिले.

  • यामुळे महायुतीत असताना भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही (भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गट) एकत्र महायुती म्हणून लढवणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. काही ठिकाणी मतभेद असले, तरी महायुती हाच आमच्यासमोरचा पहिला पर्याय राहील, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. महायुतीतील अन्य नेत्यांनीही अशीच भूमिका मांडली होती.

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पण निवडणुकीपूर्वी शिंदे गटाकडून स्वबळाची चाचणी सुरु असल्याचे म्हटले जात आहे. आज (२४ ऑगस्ट) शिंदे गटाच्या नाशिकमधील कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री दादा भुसे उपस्थित होते. तेव्हा प्रत्येक जागेसाठी पूर्ण तयारी ठेवण्याचे आदेश दादा भुसे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

पंचायत समिती असो किंवा महापालिकेचा वॉर्ड, प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार सज्ज असला पाहिजे, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे. नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर १००% भगवा फडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानानंतर शिवसेना शिंदे गट महापालिकेत स्वबळावर निवडणुकीची तयारी करत असल्याची चर्चा रंगली आहे.

Maharashtra Politics
EPFO खाते असणाऱ्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये मिळणार? पण कसे? जाणून घ्या...

महायुतीमधील पक्ष एकत्रितपणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. दुसऱ्या बाजूला, महाविकास आघाडीमधील पक्ष आगामी निवडणुका युतीतून लढवणार की स्वबळाचा नारा देणार हे अजूनही स्पष्ट झालेले नागी. आगामी निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरणार असल्याने सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

Maharashtra Politics
गर्लफ्रेंडला हॉटेलला बोलावलं, शरीरसंबंधांनंतर विवाहित पुरुषाचा मृत्यू; रुममध्ये विपरित घडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com