Actor Death : KGF चित्रपटातील अभिनेत्याचे निधन, वयाच्या ५५ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

Dinesh Mangalore : प्रसिद्ध कन्नड अभिनेते दिनेश मंगळुरू यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. राहत्या घरी त्यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून आजारी होते.
Dinesh Mangalore
Dinesh Mangalorex
Published On
Summary
  • प्रसिद्ध कन्नड अभिनेता दिनेश मंगळुरू यांचे ५५ व्या वर्षी निधन, दीर्घ आजाराने ग्रस्त होते.

  • KGF सिनेमातील शेट्टी डॉनची भूमिका साकारलेल्या दिनेश मंगळुरू यांनी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडली.

  • त्यांच्या निधनामुळे कन्नड मनोरंजन विश्वात शोककळा पसरली, अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली.

Dinesh Mangalore Death : मनोरंजनविश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेते दिनेश मंगळुरू यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. KGF सुपरहिट सिनेमामध्ये शेट्टी या डॉनची भूमिका दिनेश मंगळुरू यांनी साकारली होती. ते दीर्घ आजाराने ग्रस्त होते. उडुपी जिल्ह्यातील कुंडापुरा येथील घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

दिनेश मंगळुरू यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचा प्रवास रंगभूमीपासून सुरु झाला होता. कन्नड मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी दिनेश मंगळुरू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.

Dinesh Mangalore
हृदयविकाराच्या झटक्याने मुलाचा मृत्यू, लेकाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईनेही प्राण सोडले

१ जानेवारी १९७० रोजी दिनेश मंगळुरू यांचा जन्म झाला होता. अभिनयाच्या आवडीने त्यांची कारकीर्द सुरु झाली. सुरुवातीला त्यांना कला दिग्दर्शनामध्ये यश मिळाले. नंबर ७३ शांतीनिवास सारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या कामाची प्रतिभा दिसली. केएम चैतन्य यांच्या आ दिनागलू या चित्रपटातील सीताराम शेट्टी या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते.

Dinesh Mangalore
तो आला अन् माझ्या स्तनांना स्पर्श केला, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला तिच्यासोबत घडलेला भयंकर अनुभव

दिनेश मंगळुरू यांना लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. अभिनयाची आवड असूनही त्याची कारकीर्द कला दिग्दर्शन म्हणून झाली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. कला दिग्दर्शक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत छाप पाडली होती. केजीएफमधील भूमिकेमुळे त्यांची लोकप्रियता वाढली होती.

Dinesh Mangalore
Priya Berde : चिमटे काढले, गाल ओढले; कमरेत हात घालून... लक्ष्याच्या बायकोकडून गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com