जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याचे दर वाढले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच दर वाढल्याने आता पुढेदेखील सोन्याचे भाव वाढतील की काय अशी भिती ग्राहकांना आहे. सोन्याचे दर वाढल्याने खरेदीदारांनी सोने खरेदीसाठी पाठ फिरवली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा ३३० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Price Hike)
आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ३३० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर ९७,६४० रुपये झाले आहेत. काल हे दर काही प्रमाणात घसरले होते. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,११२ रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी घट झाली आहे. एका तोळ्यासाठी तुम्हाला ८९,५०० रुपये मोजावे लागणार आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,६०० रुपये आहे. या दरात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार होत आहेत.
आज १८ कॅरेट सोन्याचे दर ७३,२३० रुपये प्रति तोळा झाले आहे. हे दर २४० रुपयांनी वाढले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५८,५८४ रुपये झाले आहेत. या दरात १९२ रुपयांनी वाढ झाली आहे.
सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment)
सोने खरेदी करणे म्हणजे एक गुंतवणूक असते. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. जर जीएसटी जोडला तर सोन्याचे दर हमखास १ लाखांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे अनेकजण सोने खरेदी करता. परंतु सध्या सोन्याचे दर एवढे वाढले आहेत की नागरिकांच्या खिशाला ते परवडत नाही.
चांदीची किंमत (Today Silver Rate)
आज चांदीचे भाव स्थिर आहेत. १० ग्रॅम चांदीचे दर १००० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम चांदी ८०० रुपयांना विकली जात आहे. १००ग्रॅम चांदीची किंमत १०००० रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.