Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: खुशखबर! आठवड्याभरात सोनं ३९८० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीही ₹६५००० घसरली, वाचा सविस्तर

Gold Rate Today Price Drop: सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा घसरले आहेत. मागच्या आठवड्यात सोनं ३९८० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. चांदीचे दरदेखील घसरले आहेत.

Siddhi Hande

सोन्याचे दर पुन्हा घसरले

मागच्या आठवड्यात सोन्याच्या घरात पुन्हा घसरण

चांदीच्या दरातदेखील घसरण

सोने-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात मागच्या आठवड्यात घसरण झाली होती. एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचे दर ३९८० रुपयांनी घसरले आहेत. तर २२ कॅरेट सोन्याचे दरदेखील घसरले आहे.

आजदेखील सोन्याचे दर घसरले आहेत. मुंबईत सोन्याचे २४ कॅरेटचे दर १ तोळ्यामागे १५६६०० रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर ५०८७.७३ डॉलर झाले आहेत. मागच्या आठवड्याभरात सोन्याचे दर सतत घसरताना दिसत आहेत.यामुळे खरेदीदारांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील सोन्याचे दर (Gold Rate in Mumbai)

मुंबईत २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १४३५५० रुपये आहेत. २४ कॅरेटचे दर १५६६०० रुपये आहेत.

पुण्यातील सोन्याचे दर (Gold Rate in Pune)

पुण्यात सोन्याचे दर २४ कॅरेटचे १५६६००रुपये झाले आहेत.२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १४३५५० रुपये झाले आहेत.

चांदीचे दर घसरले (Silver Rate Fall)

चांदीच्या दरातदेखील मागच्या आठवड्यात घसरण झाली आहे. एका आठवड्यात सोन्याचे दर ६५००० रुपयांनी घसरले आहेत. आज चांदीचे दर प्रति किलोमागे २८५००० रुपये झाले आहे.३० जानेवारी रोजी चांदीचे दर ४ लाखांपेक्षा जास्त होते. हे दर जवळपास सव्वा दोन लाखांनी घसरले आहेत.

सोन्याचे दर सतत घसरत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी सोन्याने उच्चांक गाठला होता. सोन्याचे दर १,८२,००० रुपयांपर्यंत पोहचले होते. त्यानंतर आता हे दर १,५६,००० रुपये झाले आहेत. मागच्या दोन आठवड्यात सोन्याचे दर २६,००० रुपयांनी घसरले आहेत. सोन्याचे दर असंच घसरत राहिले तर खरेदीदारांना फायदा होणा आहे. सणासुदीच्या काळात सोने खरेदीचे प्रमाण वाढू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोलीत 15 दिवसात 5 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

सावधान! झोपताना केलेली 'ही' एक चूक वाढवू शकते कॅन्सरचा धोका

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना दरमहा ₹3,000 पेन्शन! 60 वर्षांनंतर मिळणार लाभ, जाणून घ्या अर्जाची प्रोसेस

Election: मोठी बातमी! राज्यातील ५ शिक्षक- पदवीधर निवडणुकीचे बिगुल वाजले, मतदान अन् निकाल कधी?

Chocolate Pastry Recipe: बर्थडेसाठी यावेळी घरीच बनवा मऊ, स्पाँजी चॉकलेटी पेस्ट्री, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT