सोन्याचे दर वाढले
आठवड्याभरात सोन्याचे दर कितीने वाढले?
सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना फटका
सोन्याचे दर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. सोन्याचे दर मागच्या आठवड्याभरातही खूप वाढले आहे. एका आठवड्याभरात २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३३२० रुपयांनी वाढ झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ३०५० रुपयांनी वाढले आहेत.
सध्या सोन्याचे दर २४ कॅरेटमागे १४३९३० रुपये आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर ४६०३.५१ डॉलर प्रति औंस आहे. सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातही वाढताना दिसत आहे. तुम्ही आठवड्याभरात सोन्याचे दर कितीने वाढले हे जाणून घ्या.
मुंबईतील सोन्याचे दर (Gold Rate in Mumbai)
सध्या मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर १ तोळ्यामागे १४३७८० रुपये आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर १३१८०० रुपये आहेत. सोन्याचे दर सतत वाढताना दिसत आहे.
पुण्यातील सोन्याचे दर (Gold Rate in Pune)
पुण्यातील २४ कॅरेट सोन्याचे दर १४३७८० रुपये झाले आहेत. २२ कॅरेट सोन्याचे द १४३७८० रुपये आहेत. या दरातदेखील वाढ झाली आहे.
दिल्लीतील दर
२४ कॅरेट सोन्याचे दर १४३९३० रुपये आहेत. तर २२ कॅरेटचे दर १३१९५० रुपये आहेत.
पअमेरिकेत महागाई कमी झाल्याने फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली आहे. यामुळे सोने-चांदीच्या गुंतवणूकीत वाढ झाली आहे. यामुळेदेखील सोने-चांदीचे दर वाढताना दिसत आहे.
चांदीचे दर (Silver Rate)
चांदीचे दरदेखील मागच्या आठवड्यात वाढले आहेत. एका आठवड्यात जवळपास ३५००० रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीचे दर आज १ किलोमागे २९५००० रुपये आहेत. चांदीचे दर २०२६ मध्ये आतापर्यंत २२.४ टक्क्यांनी वाढले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.