Gold investment : सोनं- चांदी का महागतयं? आता गुंतवणुक किती फायदेशीर?

Gold rates hikes : सोनं आणि चांदीच्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडताय.... मात्र सोन्या-चांदीतली गुंतवणुक भविष्यात किती फायदेशीर आहे? सोन्या- चांदीत खरचं गुंतवणुक करावी का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Gold- Silver Price
Gold Silver Price Todaysaam tv
Published On

ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्यानं नवा उच्चांक गाठलाय..सोन्यानं तब्बल प्रति तोळा 1 लाख 40 हजारांचा टप्पा ओलांडलाय.. तर चांदीच्या दरात 10 हजारांची वाढ झाल्यानं चांदी प्रति किलो 2 लाख 60 हजारांवर पोहोचलीय... मात्र सोनं आणि चांदीचे दर गगनाला का भिडलेत... पाहूयात...

जगात रशिया युक्रेन आणि मध्यपुर्वेतील युद्धामुळे अनिश्चितता

अमेरिकेच्या युद्धखोर भुमिकेमुळे गुंतवणुकदारांमध्ये भीतीचं वातावरण

शेअर बाजारापेक्षा सोन्याला सुरक्षित पर्याय मानला जातो...

अमेरिकेच्या टॅरिफ वॉरमुळे भारतीय गुंतवणूकदारांकडून सोने खरेदीला प्राधान्य

मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा खरेदी करण्यास सुरुवात

अमेरिकेच्या फेडरल बँकेनं व्याजदरात कपात केल्यानं सोन्याला चमक

औद्योगिक वापरासाठी चांदीचा वापर वाढल्यानं चांदी महाग

Gold- Silver Price
बदलापूरच्या तुषार आपटेवरून महायुतीत बिनसलं; अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट भाजपवर निशाणा

खरंतर जगात युद्धखोर नेत्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय.. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धखोर भूमिका, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी यामुळे गुंतवणुकदार चिंतेत आहेत.. तर शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापेक्षा गुंतवणूकदार सोने चांदीकडे वळलेत... मात्र एवढ्या वेगानं सोने, चांदीचे दर वाढत असताना त्यात गुंतवणूक करणं कितपत योग्य आहे...पाहूयात..

जगावर युद्धाचं सावट असल्यानं सोनं आणि चांदी हाच गुंतवणुकीचा उत्तम मार्ग असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.. त्यातच 2025 मध्ये सोन्यानं 76 टक्के तर चांदीनं 144 टक्के रिटर्न दिलंय..तुमच्या गुंतवणुकीच्या 10-15 टक्के सोन्यात गुंतवणूक करणं सुरक्षित मानलं जातंय.. 2026 मध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे..त्यामुळे दागिने, नाणी, ईटीएफ, तसंच गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.

Gold- Silver Price
ऐन निवडणुकीत महायुती सरकारला मोठा धक्का; लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडले, कारण काय?

जगभरातील सत्ताधाऱ्यांच्या अघोरी महत्वाकांक्षा, अमेरिका चीनमधील वाढता संघर्ष आणि जग शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची भीती यामुळे गुंतवणूकदार सोने, चांदीकडे वळत आहेत... मात्र यानंतरही गुंतवणूक करताना काळजी घेण्याची गरज आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com