बदलापूरच्या तुषार आपटेवरून महायुतीत बिनसलं; अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट भाजपवर निशाणा

badlapur politics : बदलापूरच्या तुषार आपटेवरून महायुतीत बिनसल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने थेट भाजपवर निशाणा साधला आहे.
Badlapur politcs
badlapur politics Saam tv
Published On
Summary

आरोपी तुषार आपटेवरून महायुतीत आरोप-प्रत्यारोप

राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा भाजपवर निशाणा

अमोल मिटकरी यांची कल्याणमध्ये भाजपवर टीका

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

बदलापूर येथील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्वीकृत नगरसेवक केल्याच्या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र निषेध केला आहे. केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये आले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, माणुसकीचा काळिमा फासणाऱ्या व्यक्तीला अशा पद्धतीने स्वीकृत नगरसेवक करणे म्हणजे संविधानाची आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि आपल्या पक्षाची गरिमा जपावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Badlapur politcs
एक दिवस हिजाब घालणारी महिला भारताची पंतप्रधान होईल; खासदार औवेसींचा दावा

यावेळी बोलताना आमदार मिटकरी यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावरही जोरदार टीका केली. काही लोक जातीवादाच्या आधारावर निवडणूक लढवतात, असा आरोप करत त्यांनी सांगितले की, महेश लांडगे यांना इतका माज आणि मस्ती चढली आहे की ते थेट अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर बोलू लागले आहेत.

Badlapur politcs
लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या महिलांना मिळणार नाहीत? महत्वाची अपडेट समोर

'अरे तुरेची भाषा त्यांना येत असेल तर आम्हालाही येते,असे म्हणत त्यांनी लांडगे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा तीव्र निषेध केला. महिलांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे वक्तव्य लाजिरवाणे असून, त्यांना त्यांची लायकी काय आहे ते पुण्यातील जनता दाखवून देईल, असा इशाराही आमदार अमोल मिटकरी यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेनंतर भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जातंय, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com