लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या महिलांना मिळणार नाहीत? महत्वाची अपडेट समोर

ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर काहींना पैसे मिळणे कायमस्वरुपी बंद होणार आहे.
ladki bahin yojana update
ladki bahin yojanaSaam tv
Published On
Summary

योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूशखबर

मकर संक्रांतीच्या आधी ३ हजार रुपये मिळणार असल्याचा दावा

डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते एकाच दिवशी मिळणार असल्याचा दावा

महाराष्ट्रातील प्रसिद्ध मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूशखबर हाती आली आहे. लाडकी बहिणींच्या बँक खात्यात १४ जानेवारी आधी तीन हजार रुपये जमा होणार असल्याचा दावा केला जात आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला. त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी दोन हप्ते एकत्र मिळणार असल्याचा दावा केला जातोय. मात्र, आता ई-केवायसी न केलेल्या महिलांना योजनेचे पैसे यापुढे कायमचे मिळणार नसल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्त्याचे एकूण ३०००० रुपये बँक खात्यात एक खटी पाठवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु ज्यांनी या योजनेसाठी ई-केवायसीची प्रक्रिया केलेली नाही, त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. ई-केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर इतकी होती.

ladki bahin yojana update
एक दिवस हिजाब घालणारी महिला भारताची पंतप्रधान होईल; खासदार औवेसींचा दावा

दोन महिन्यांपासून तांत्रिक अडचणीमुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे अडकले होते. या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे मिळून ४५०० रुपये मिळणार होते. परंतु राज्य सरकारने मागच्या आठवड्यात लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला.

ladki bahin yojana update
कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टर्सवरून राजकारण तापलं आहे. पोस्टर्समध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin yojana) ३००० रुपये बँक खात्यात जमा होतील, असा दावा केला जातोय. परंतु यामुळे आचारसंहितेचा भंग होतोय, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे . तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी मुंबईतील भाजप उमेदवाराने लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये मकर संक्रांतीच्या दिवशी मिळेल, असा दावा केला होता. १४ जानेवारी आधीच लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये मिळतील, असा दावा करण्यात येतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com