'देवा'च्या मनात असेल तर तेही होईल; मुंबई महापौरपदाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य,चर्चांना उधाण

Municipal Corporation Election: मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या महापौरपदाबद्दल मोठं विधान केलंय. यामुळे राजकारणात राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
Municipal Corporation Election:
Uddhav Thackeray interacting with newly elected Mumbai corporators at Matoshree.saam tv
Published On
Summary
  • मातोश्रीवर नवनिर्वाचित नगरसेवकांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट

  • महापौरपदावर उद्धव ठाकरेंचं सूचक आणि मोठं विधान

  • मुंबईच्या राजकारणात चर्चांना वेग

मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संवाद साधताना महापौरपदाबाबत मोठं विधान केलंय. आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Municipal Corporation Election:
BMC Election: मुंबईतील 25 वर्षांची सत्ता भाजपनं उलथवली; दोन्ही ठाकरे बंधूंचा करिष्मा का कमी पडला?

मातोश्रीवर आज मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्याशी संवाद साधला. भाजप आणि ठाकरे सेनेत खूप फरक आहे. भाजपला वाटतं की कागदावरची शिवसेना त्यांनी संपवली, पण जमिनीवरची शिवसेना ते कधीच संपवू शकत नाहीत. कारण ते कधी जमिनीवर राहू शकत नसल्याचा खणखणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.

Municipal Corporation Election:
Dombivli Violence : मतदानाआधी डोंबिवलीत रक्तरंजीत राडा, कोयत्याने हल्ला, पैसे वाटपावरून भाजप-शिवसेना शिंदेसेना आमनेसामने

नगरसेवकांचे अभिनंदनकरताना उद्धव ठाकरे म्हणाले, यशाचे मानकरी तुम्ही सगळे आहात. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. जो निकाल या सगळ्या परिस्थितीमध्ये लागला तो अभिमानास्पद आहे. साम दाम दंड भेद यंत्रणेचा दुरुपयोग करून सगळं काही केलं गेलं. गद्दार निघून गेले मात्र ते निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत. मी सगळ्यांना मानाचा मुजरा करतो आणि जबाबदार आपली वाढली असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.

Municipal Corporation Election:
Mahayuti: छत्रपती संभाजीनगरात भाजप-शिंदेसेना आमनेसामने; पराभवावरून आमदारानं डिवचलं

देवाच्या मनात असेल तर...

आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल असं सूचक विधान सुद्धा उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. गद्दारी करून त्यांनी विजय मिळवलाय. तो मुंबई गहाण ठेवण्यासाठीच असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर केला. या पापाला मराठी माणूस कधी क्षमा करणार नाही. मात्र, तुम्ही अभिमानाने लढला, तुम्ही निष्ठेसाठी लढला त्यामुळे तुमचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com