Voting
Votingx

Dombivli Violence : मतदानाआधी डोंबिवलीत रक्तरंजीत राडा, कोयत्याने हल्ला, पैसे वाटपावरून भाजप-शिवसेना शिंदेसेना आमनेसामने

Pre-poll violence in Dombivli between BJP and Shiv Sena Shinde faction : मतदानाआधी डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून जोरदार राडा झाला. कोयत्याने हल्ल्याचे आरोप, अनेक जण जखमी, पोलिस तपास सुरू असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Published on

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही न्यूज, डोंबिवली

BJP and Shinde Sena clash over cash distribution claims : कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकी दरम्यान डोंबिवलीत पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. डोंबिवली पूर्वेतील तुकारामनगर परिसरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. ही घटना पॅनल क्रमांक २९ मधील प्रचाराच्या पार्श्वभूमीवर घडली. या पॅनलमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात युती नसल्यामुळे दोन्ही पक्ष आमनेसामने आहेत.

भाजपकडून कविता म्हात्रे, आर्या नाटेकर, मंदार टावरे, अलका म्हात्रे तर शिवसेना शिंदे गटाकडून रूपाली म्हात्रे, रंजना पाटील, नितीन पाटील आणि रवी पाटील हे उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत एक महिला आणि तीन पुरुषांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.पण, कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सोमवारी रात्री पुन्हा वातावरण तंग झालं.सोमवारी रात्री तुकारामनगर येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि कार्यकर्त्यांनी भाजपवर पैसे वाटपाचे आरोप करत गोंधळ घातला.

Voting
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विरोधकांवर टीका करू नका, भाजपच्या वरिष्ठांकडून उमेदवारांना कानमंत्र

याच दरम्यान जोरदार हाणामारी झाली. या घटनेत भाजपा उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्यासह आणखी दोन जण जखमी झाले आहेत. भाजप उमेदवार व जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी गंभीर आरोप करत सांगितले की गणपतीच्या दर्शनाला गेले असताना शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी कोयत्याने हल्ला केला. त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील यांनी हे आरोप फेटाळत प्रत्यारोप केले आहेत.

Voting
Akola : 'भाजप-एमआयएम' युतीचा दुसरा अंक, MIM च्या सर्वच नगरसेवकांचं भाजप नेत्याच्या मुलाला समर्थन

पैसे वाटप करत असताना आम्ही लोकांना पकडून पोलिसांना फोन केला. मारहाण आम्ही केली नाही, भाजप कार्यकर्त्यांनी दादागिरी केली. रवींद्र चव्हाण यांनी पक्षात येण्याचा दबाव टाकला, तो नाकारल्याचा राग आमच्यावर काढण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी अर्धा तास रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत पोलिसांच्या निष्क्रियतेवर सवाल उपस्थित केले. यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी घटनास्थळी येऊन उमेदवारांची समजूत काढली.

Voting
ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीची तारीख आली समोर, आयोगाला कोर्टाने दिली पुन्हा मुदत, वाचा

राजेश मोरे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की पैसे वाटप करणाऱ्यांवर उद्या पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली जाईल. कारवाई झाली नाही, तर रस्त्यावर उतरणार.दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारी नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून तपास सुरू आहे. या सलग दोन दिवसांत झालेल्या घटनांमुळे कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचाराला हिंसक वळण लागले असून परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला आहे.

Voting
भरसभेत कार्यकर्ता I Love You म्हणाला, अजित पवार म्हणाले घरी जाऊन बायकोला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com