Akola : 'भाजप-एमआयएम' युतीचा दुसरा अंक, MIM च्या सर्वच नगरसेवकांचं भाजप नेत्याच्या मुलाला समर्थन

BJP MIM alliance Maharashtra : अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये पुन्हा एकदा भाजप-एमआयएम युती चर्चेत आली आहे. स्विकृत नगरसेवक निवड प्रक्रियेत एमआयएमच्या सर्व नगरसेवकांनी भाजप नेत्याच्या मुलगा जितेन बरेठिया यांना समर्थन दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Akola Akot political news
Akola Akot political news Saam
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Akola Akot political news : अकोला जिल्ह्यतील अकोटमध्ये झालेल्या 'भाजप-एमआयएम' युतीवरून देशभरात मोठा गदारोळ उडाला होताय. या युतीसाठी जबाबदार धरत स्थानिक आमदार प्रकाश भारसाकळे यांना भाजपने कारणे दाखवा नोटीस पाठवली होतीय. या सर्व घडामोडीनंतर एमआयएम भाजपच्या नेतृत्वाखालील 'अकोट विकास मंचा'तून बाहेर पडला होता. त्यानंतर एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी स्वत:चा गट स्थापन केला होता.

पहिल्या युतीने वाद झाल्यानंतर आज परत ही युती नव्याने वेगळ्या रूपात परत आलीय. आज स्विकृत सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेत परत 'भाजप-एमआयएम' युती वेगळ्या रूपात समोर आलीय. एमआयएमकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी एमआयएमकडून ताज राणा यांचं नाव आलं होतंय. यासोबतच एमआयएमने भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचा मुलगा जितेन बरेठिया यांनाही उमेदवारी दिलीय. यात ताज राणा यांनी वेळ निघून गेल्यावर उमेदवारी दाखल केल्याचे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आला नाहीय. त्यामूळे एमआयएमकडून एकमेव अर्ज आलेले भाजपचे जितेन बरेठिया हे एमआयएमचे स्विकृत नगरसेवक असतील. एमआयएमचे स्विकृत नगरसेवक पदाचे उमेदवार ताज राणा कोर्टात जाण्याच्या तयारीत.

Akola Akot political news
'मार्व्हल'स्टाईल कॅम्पेनने भाजपची मुंबईच्या प्रचारात आघाडी, विरोधक राहिले मागे

मात्र, भाजपने एमआयएमसोबत युती करण्यास कारणीभूत असलेले आमदार प्रकाश भारसाकळे आणि शहराध्यक्ष हरीश टावरी यांच्यावर अद्यापही कारवाई केली नाहीये. स्विकृत सदस्यामूळे अकोटमध्ये भाजप-एमआयएम युतीची परत नव्याने चर्चा सुरू झालीय. दरम्यान, यानंतर काँग्रेसने भाजप आणि एमआयएमवर ताशेरे ओढले..

Akola Akot political news
ZP Elections : मिनी विधानसभेचं बिगुल वाजणार, दोन की एकाच एकाच टप्प्यात निवडणूक? वाचा लेटेस्ट अपडेट

भाजपच्या उमेदवाराला स्विकृत नगरसेवक पदासाठी समर्थन देणारे एमआयएमचे 5 नगरसेवक:

1) आफरीन अंजुम शरीफोद्दीन : गटनेता

2) दिलशादबी रज्जाक खा

3) रेशमा परविन मोहम्मद अजीम

4) डॉ. युसूफ खान हादीक खान

5) हन्नान शाह सुलतान शाह

Akola Akot political news
ZP Elections : मिनी विधानसभेचं बिगुल वाजणार, दोन की एकाच एकाच टप्प्यात निवडणूक? वाचा लेटेस्ट अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com