Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सोन्याला चकाकी! ५८०० रुपयांनी सोनं महागलं, ७२ तासांत किती किमती वाढल्या?

Gold-Silver Price Hike: सोनं-चांदीचे नवे दर आज जाहीर झाले. आज सोन्याच्या २४,२२ आणि १८ कॅरेटच्या दरात वाढ झाली. पण चांदीच्या दरात आज कोणताही बदल झाला नाही.

Priya More
  • सोन्याच्या दरात ७२ तासांत ५८०० रुपयांची वाढ

  • आजचा २४ कॅरेट सोन्याचा दरात २५० रुपयांनी वाढ

  • २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर देखील आज वाढले

  • सोन्याच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला

सोनं- चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात सतत चढ-होताना दिसत आहे. सोन्याचे दर वाढतच चालेल आहे त्यामुळे ग्राहकांमद्ये नाराजी पाहायला मिळत आहेत. आज देखील सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामद्ये २७० रुपयांची वाढ झाली. या सोन्याची किंमत १,५५,१३० रुपयांवर गेले आहेत. तर बुधवारी हे सोनं १,५४,८६० रुपये प्रति तोळा विकले गेले.

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा २५० रुपयांनी वाढले. हे सोनं आज १,४२,२०० रुपयांना विकले जात आहे. तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाली. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं २१० रुपयांनी वाढले. हे सोनं आज १,१६,३६० रुपयांना विकले जात आहे. सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली.

गेल्या ७२ तासांमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. अवघ्या ३ दिवसांत १ तोळा सोन्याच्या दरात ५,८०० रुपयांनी वाढ झाली. देशांतर्गत बाजारात गेल्या ५ दिवसांत सोन्याच्या दरात प्रति तोळा ८,६४४ रुपयांची वाढ झाली. या सर्व वाढीमुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दराने प्रति ग्रॅम १.५२ लाख रुपयांचा ऐतिहासिकक उच्चांक गाठला आहे.

सोन्यापाठोपाठ चांदीच्या दराने देखील नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या ७२ दिवसांत चांदीच्या दरात प्रति किलो १३,२०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसांत चांदीचे दर १४,२६८ रुपयांवरून १५,४३५ रुपयांपर्यंत वाढले आहे. चांदीच्या दराने प्रति किलो २.५५ लाख रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. आज चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. आज चांदीचे दर प्रति ग्रॅम २५५ रुपये इतका आहे. एक किलो चांदी २,५५,००० रुपयांना आज विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

SCROLL FOR NEXT