चोरांनी रात्री दुकान फोडलं, २२ किलो चांदी लंपास केली; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Sakinaka Police Bust Burglary Gang: साकीनाका परिसरातील घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून २२ किलो चांदी, रोख रक्कम आणि मोबाईलसह सुमारे ४४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Sakinaka Police arrested four members of burglary gang and recovered 22 kg silver
Sakinaka Police arrested four members of burglary gang and recovered 22 kg silversaam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: साकीनाका परिसरात घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या सराईत टोळीचा साकीनाका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून २२ किलो चांदी, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून २६ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत साकीनाका येथील जरीमेरी परिसरात चोरीची घटना घडली. तक्रारदार मोहम्मद हुसेन अब्दुल करीम खान हे भंगार व्यवसाय करतात. त्यांच्या एस.पी. इंटरप्रायजेस नावाच्या भंगाराच्या दुकानात अज्ञात इसमांनी प्रवेश करून टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली २ लाख रुपयांची रोकड, कपाटात ठेवलेली २२ किलो चांदी तसेच दुकानात झोपलेल्या कामगाराचा मोबाईल फोन चोरून नेला.

या घटनेनंतर तक्रारदाराच्या फिर्यादीवरून साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला.

Sakinaka Police arrested four members of burglary gang and recovered 22 kg silver
Crime News: पुण्यातील फेमस रीलस्टारला अटक; ५ हजारांहून अधिक बँक खात्यांतून १० कोटींचं मनी ट्रेल, हाँगकाँग कनेक्शन उघड

तपासादरम्यान रमजान मकसूद शाह याला ठाणे परिसरातून, झिशान अब्दुल सादिक खान याला ठाणे परिसरातून, तर अख्तर हुसेन गुलाम मुस्तफा खान आणि इरफान नुरुल्ला खान यांना मुंबई परिसरातून ताब्यात घेण्यात आले. अटक आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांच्या प्रेस नोटनुसार २२ किलो चांदी आणि मोबाईल फोनसह मुद्देमालाची किंमत सुमारे ४४.३० लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास साकीनाका पोलिसांकडून सुरू आहे.

Sakinaka Police arrested four members of burglary gang and recovered 22 kg silver
Mumbai : पाणी टंचाईची कटकट संपली! मुंबईच्या तलावांमध्ये ८९.४९ टक्के पाणीसाठा, कोणते तलाव किती भरले? जाणून घ्या

ही कारवाई साकीनाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश मांडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सचिन उगले, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र माळी आणि त्यांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com