Mumbai : पाणी टंचाईची कटकट संपली! मुंबईच्या तलावांमध्ये ८९.४९ टक्के पाणीसाठा, कोणते तलाव किती भरले? जाणून घ्या

Mumbai Water Storage Update News : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये ८९.४९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मोडक सागर आणि विहार तलाव १०० टक्के भरले आहे.
Mumbai Seven Lakes Reach 89.49% Water Stock | Latest Update
Mumbai Seven Lakes Reach 89.49% Water Stock | Latest UpdateAI
Published On
Summary
  • मुंबईच्या सातही तलावांमध्ये ८९.४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

  • मोडक सागर आणि विहार तलाव १०० टक्के भरले

  • तुलसीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत सर्वाधिक ९६ मिमी पावसाची नोंद

  • विहार तलाव ७ जुलैपासून ओसंडून वाहत आहे

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. आज, १२ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता तलावांमध्ये एकूण १२,९५२७४ दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. हा साठा एकूण उपयुक्त जलसाठ्याच्या ८९.४९ टक्के इतका आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यंदाचा पाणी साठा गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा किंचित अधिक आहे. २०२५ मध्ये याच दिवशी तलावांमध्ये १२,९१,०३० दशलक्ष लिटर म्हणजेच ८९.२० टक्के पाणीसाठा होता. मात्र, २०२४ च्या तुलनेत यंदाचा साठा कमी असून, त्या वर्षी १३,३९,६०२ दशलक्ष लिटर म्हणजे ९२.५५ टक्के साठा होता.

Mumbai Seven Lakes Reach 89.49% Water Stock | Latest Update
Mosquito Bites : डास शोधून शोधून तुम्हालाच का चावतात? समोर आले धक्कादायक कारण

सध्या मोडक सागर आणि विहार तलाव १०० टक्के भरले आहेत. तुलसी तलावातही जवळपास पूर्ण म्हणजे ९९ टक्के साठा आहे. तानसा तलाव ९८.७७ टक्के, मध्य वैतरणा ९२.८ टक्के, तर भातसा तलावात ८७ टक्के पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणा तलावात ८१.०१ टक्के साठा नोंदवण्यात आला आहे.

Mumbai Seven Lakes Reach 89.49% Water Stock | Latest Update
Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोन्याचे भाव वाढले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहोचले; जाणून घ्या 24k, 22k,18k चे दर

गेल्या २४ तासांत तलावांच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू होत्या. यामध्ये तुलसी येथे सर्वाधिक ९६ मिमी पावसाची नोंद झाली. विहारमध्ये ८० मिमी, मोडक सागर येथे ५९ मिमी, तर मध्य वैतरणा येथे ४८ मिमी पाऊस पडला. दरम्यान, विहार तलाव ७ जुलैपासून ओसंडून वाहत आहे. अप्पर वैतरणातून पाण्याचा विसर्ग ६ जुलैपासून बंद आहे, तर मध्य वैतरणा WSCPO गेटही सध्या बंद आहे. तसेच मुंबईत पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com