संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी
gold price in Jalgaon increased by ₹9500 in 10 days : जळगावच्या प्रसिद्ध सुवर्ण बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे सोन्याची बाजारपेठ चांगल्याच तेजीच्या मार्गावर आहे. गेल्या अवघ्या दहा दिवसांत सोन्याच्या भावात प्रतिदहा ग्रॅम मागे तब्बल ९ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे १८ हजार रुपयांची प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे.
१ ऑगस्टला सोन्याचा भाव एक लाख ४२ हजार ५०० (प्रतिदहा ग्रॅम, वेनाजीएसटी) होता. मंगळवारी सोन्याचा भाव एक लाख ५२ हजार आहे. एकूण साडेनऊ हजार रुपयांची दहा दिवसांत वाढ झाली आहे. १ ऑगस्टला चांदी दोन लाख २१ हजार (प्रतिकिलो, विनाजीएसटी) होती. मंगळवारी चांदी दोन लाख ३९ हजार रुपयांवर (प्रतिकिलो, विनाजीएसटी) आली आहे. चांदीत १८ हजारांची वाढ झाली आहे.
दहा दिवसांत कसा बदलला भाव? (विना जीएसटी):
१ ऑगस्ट रोजी सोन्याचा भाव १ लाख ४२ हजार ५०० रुपये (प्रति १० ग्रॅम) इतका होता. त्यानंतर भावात सातत्याने वाढ होत मंगळवारी (११ ऑगस्ट) सोन्याचा दर १ लाख ५२ हजार रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच १० दिवसांत सोन्यात ९,५०० रुपयांची वाढ झाली आहे. (५ ऑगस्ट रोजी सोन्याचा दर १ लाख ४५ हजार रुपये इतका होता.)
तर १ ऑगस्ट रोजी चांदीचा दर २ लाख २१ हजार रुपये (प्रति किलो) होता. मंगळवारी चांदीचा दर २ लाख ३९ हजार रुपयांवर पोहोचला असून, चांदीत तब्बल १८ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
ऐन सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत ही मोठी वाढ झाल्यामुळे खरेदीदारांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि शेअर बाजारातील चढ-उतार यामुळे सोन्या-चांदीच्या दरात ही अनपेक्षित वाढ पाहायला मिळत आहे. ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडत असून, येत्या काही दिवसांत बाजारात दर स्थिर होणार की आणखी वाढणार, याकडे खरेदीदारांचे आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.