India-China Border : मोठी बातमी! अरुणाचल सीमेवर भारत आणि चीनचे सैन्य भिडले; ६ वर्षांनंतर पुन्हा ठिणगी

India China border, Arunachal Pradesh LAC : अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनचे सैनिक गस्तीदरम्यान आमनेसामने आल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगितले जात आहे.
India China troops face off along Arunachal Pradesh LAC latest news :
India China troops face off along Arunachal Pradesh LAC latest news :Saam TV (AI Image)
Published On

India China troops face off along Arunachal Pradesh LAC latest news : भारत आणि चीन सीमेवरून एक मोठी बातमी समोर येत आहे. अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) ६ वर्षांनंतर भारत आणि चीनचे सैनिक पुन्हा एकदा आमनेसामने आल्याची घटना घडली आहे. २०२० मधील गल्वान खोऱ्यातील घटनेनंतर सीमेवर काही प्रमाणात शांतता होती. पण आता अरुणाचल सीमेवर झालेल्या या नव्या चकमकीमुळे आणि दोन्ही सैन्यांमधील तणावामुळे सीमावर्ती भागात पुन्हा एकदा सुरक्षेची मोठी चिंता निर्माण झाली आहे.

अरुणाचल प्रदेशजवळ LAC वर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये पुन्हा एकदा तणावाची स्थिती झाली आहे. त्यामुळे सीमा पुन्हा चर्चेत आली आहे. गस्तीदरम्यान दोन्ही बाजूंचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे एक छायाचित्र समोर आले आहे.

भारतीय लष्कराने या छायाचित्रावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण हे छायाचित्र २६ जुलै रोजीचे असल्याचे मानले जात आहे. LAC वर गस्त घालत असताना भारत आणि चीनचे सैनिक कथितरित्या समोरासमोर आले होते आणि त्यांनी ध्वज कवायत केली होती.

India China troops face off along Arunachal Pradesh LAC latest news :
टाटा ग्रुपमध्ये मोठी उलथापालथ! एन.चंद्रशेखरन यांचा तडकाफडकी राजीनामा; कॉर्पोरेट जगतात खळबळ

चिनी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये लिहिलेला एक बॅनर घेऊन चिनी सैनिक उभे असलेले दिसले. दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ कमांडरांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पण त्याआधी हा कथित संघर्ष जवळपास एक आठवडाभर सुरू होता असा दावा काही रिपोर्टमध्ये केला जातोय.

India China troops face off along Arunachal Pradesh LAC latest news :
ZP School : जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला; १३ विद्यार्थी गंभीर, राज्यात खळबळ

LAC च्या अरुणाचल प्रदेश भागातील ही महत्त्वाची घटना आहे. कारण, यापूर्वी २०१७ मध्ये डोकलाम सेक्टरमध्ये दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. छायाचित्रासोबतच्या माहितीनुसार, सैनिक अनेक दिवस आमनेसामने उभे ठाकले होते. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर अखेरीस परिस्थिती निवळली.

यापूर्वी २०२० मध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. १५ जून २०२० रोजी झालेल्या एका भीषण हाणामारीत या संघर्षाची परिणती झाली. यात २० भारतीय सैनिक शहीद झाले आणि चिनी सैनिकांच्या मृत्युची संख्या जाहीर करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com