टाटा ग्रुपमध्ये मोठी उलथापालथ! एन.चंद्रशेखरन यांचा तडकाफडकी राजीनामा; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Tata Group, N Chandrasekaran : टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आगामी एजीएमपूर्वी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
N Chandrasekaran resigns as Tata Sons chairman before AGM
N Chandrasekaran resigns as Tata Sons chairman before AGM
Published On

N Chandrasekaran resigns as Tata Sons chairman before AGM : देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या टाटा सन्सच्या (Tata Sons) अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. आगामी वार्षिक सर्वसाधारण बैठकीपूर्वीच (AGM) टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दशकापासून टाटा समूहाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या चंद्रशेखरन यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे उद्योग जगतात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखरन यांचा अधिकृत कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ पर्यंत होता. पण १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या एजीएम बैठकीत त्यांच्या फेरनियुक्तीबाबत आणि टाटा ट्रस्टसोबतच्या धोरणात्मक मतभेदांबाबत विविध चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुदतीपूर्वीच पद सोडण्याचा निर्णय घेत बोर्डाला अवगत केले आहे.

N Chandrasekaran resigns as Tata Sons chairman before AGM
ZP School : जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला; १३ विद्यार्थी गंभीर, राज्यात खळबळ

ईटीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ६३ वर्षीय चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळाला आपल्या निर्णयाबद्दल कळवले आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये त्यांचा कार्यकाळ अधिकृतपणे संपेपर्यंत ते या पदावर कायम राहतील. पण चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीनंतर टाटा समूहाची कंपनी टीसीएस आणि इतर टाटा कंपन्यांच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

N Chandrasekaran resigns as Tata Sons chairman before AGM
मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वीचा निर्णय

१८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) टाटा सन्समध्ये अंदाजे ६६% हिस्सा असलेल्या टाटा ट्रस्ट्सच्या मतदानाच्या पद्धतीबाबत अनिश्चितता असताना चंद्रशेखरन यांनी हा निर्णय घेतला आहे. टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांचा चंद्रशेखरन यांच्या पदावर कायम राहण्यास विरोध असल्याचे मानले जाते. त्यामुळे एन. चंद्रशेखरन यांच्या जवळपास दहा वर्षांच्या कार्यकाळाचा अचानक शेवट झाला.

ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स यांसारख्या टाटा कंपन्यांचे अध्यक्ष आहेत आणि २०१७ मध्ये टाटा सन्सची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी समूहाच्या व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com