ZP School : जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला; १३ विद्यार्थी गंभीर, राज्यात खळबळ

Solapur Akkalkot school slab collapse 13 students injured : सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बबलाद जिल्हा परिषद शाळेत स्लॅबचा भाग विद्यार्थ्यांवर कोसळला. या दुर्घटनेत १३ विद्यार्थी जखमी झाले असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
Bablad Zilla Parishad school accident latest news
Bablad Zilla Parishad school accident latest newsSaam TV
Published On

विश्वभूषण लिमये, सोलापूर प्रतिनिधी

Bablad Zilla Parishad school accident latest news : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बबलाद येथील जिल्हा परिषदेच्या कन्नड मध्यमाच्या शाळेत पोर्चमधील स्लॅबचा काही थर अचानक विद्यार्थ्यांवर कोसळला. या दुर्दैवी घटनेत १३ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने, सर्व जखमी विद्यार्थ्यांवर तात्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. सध्या त्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

नेमकी घटना काय?

अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषदेची शाळा जवळपास २५ वर्षे जुनी आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास विद्यार्थी पोर्च परिसरात खेळत होते. त्याचवेळी इमारतीच्या जुन्या झालेल्या स्लॅबचा भाग अचानक खाली पडला. स्लॅबचा हा थर थेट विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळल्याने तब्बल १३ मुले जखमी झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शाळेत आणि परिसरात एकच घबराट पसरली.

प्रशासनाची धावपळ आणि प्राथमिक उपचार

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि शिक्षकांनी मदतीसाठी धाव घेतली. तात्काळ रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) मागवून जखमी विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदतीसाठी हलवण्यात आले. तसेच, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांवर तात्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले असून, त्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com