Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate: खरेदीदारांना दिलासा! आठवड्याभरानंतर सोन्याचे दर घसरले; वाचा १ तोळ्याचे भाव किती?

Gold Rate Today Jalgaon: सोन्याच्या दरात जवळपास १० दिवसानंतर घसरण झाली आहेत. जळगावात सराफा बाजारात सोन्याचे दर काल ८०० रुपयांनी घसरले होते.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात घसरण

मागच्या आठवड्यात सोन्याचे दर वाढले होते

सोन्याच्या दरात ८०० रुपयांची घसरण

जळगावात सोनं-चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार सुरु आहे. मागील आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली. गुरुवारी २६ जानेवारी रोजी सोने-चांदीच्या भावात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळाले. चांदीचे भाव पाच हजार रुपयांनी घसरले तर सोने ८०० रुपयांनी कमी झाली होती.

सुवर्ण बाजारात मागील काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहण्यास मिळत आहे. तीन महिन्यांपूर्वी भाव रेकॉर्ड ब्रेक किमतीवर पोहोचले होते. त्यानंतर मात्र थोडा दिलासा मिळाला. तरीही सोने व चांदीचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. चांदी प्रतिकिलो पावणेतीन लाखांपर्यंत आहे, तर सोने प्रतिदहा ग्रॅम दीड लाख रुपयांच्या वर आहे.

आठवडाभरानंतर खरेदीदारांना दिलासा

१८ फेब्रुवारीपासून सोन्याच्या भावात नऊ हजार रुपयांची, तर चांदीच्या भावात ३२ हजार रुपयांची वाढ झाली होती. आठवडाभरातील वाढीनंतर गुरुवारी सोन्या- चांदीचे भाव कमी झाले आहेत. बुधवारी चांदी दोन लाख ७५ हजार रुपयांवर पोहोचली होती. त्यात गुरुवारी पाच हजार रुपयांची घसरण होऊन चांदी दोन लाख ७० हजार रुपयांवर आली, तर सोन्याच्या भावात

८०० रुपयांची घसरण होऊन एक लाख ५९ हजार ८०० रुपयांवरून एक लाख ५९ हजार रुपये (प्रतिदहा ग्रॅम) झाले आहेत.

मागच्या १० दिवसातील सोन्याचे भाव

१८ फेब्रुवारी सोन १ लाख ५२ हजार ५००तर चांदी २ लाख ४३ हजार

१९ फेब्रुवारी सोनं १ लाख ५४ हजार ६०० तर चांदी २ लाख ५० हजार

२० फेब्रुवारी सोनं १ ५४ हजार ९०० तर चांदी २ लाख ५० हजार

२१ फेब्रुवारी सोन १ लाख ५७ हजार तर चांदी २ लाख ६७ हजार

२३ फेब्रुवारी सोन १ लाख ५८ हजार तर चांदी २ लाख ७२ हजार

२४ फेब्रुवारी सोन १ लाख ५९ हजार तर चांदी २ लाख ७३ हजार

२५ फेब्रुवारी सोनं १ लाख ५९ हजार ८००तर चांदी २ लाख ७५ हजार

२६ फेब्रुवारी सोन १ लाख ५९ हजार तर चांदी २ लाख ७० हजार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT