Gold-Silver Price: एका झटक्यात चांदी ₹ १५२०० वाढली, सोन्याच्या दरातही मोठी वाढ; नेमकं कारण काय?

Gold and silver prices hike: सोनं-चांदीच्या दरामध्ये आज पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. चांदीचे दर १५२०० रुपयांनी वाढले. तर १ तोळा सोनं ३,७०० रुपयांनी वाढले. सोनं-चांदीचे दर वाढण्यामागचे नेमकं कारण काय आहे ते घ्या जाणून...
Gold-Silver Price: एका झटक्यात चांदी ₹ १५२०० वाढली, सोन्याच्या दरातही मोठी वाढ; नेमकं कारण काय?
Gold and silver prices Saam Tv
Published On

Summary -

  • ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेमुळे आणि अमेरिका-इराण युद्धतणावामुळे बाजारात भीतीचे वातावरण

  • एमसीएक्सवर चांदी १५,२०० रुपयांनी तर सोनं ३,७०० रुपयांनी वाढले

  • गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसे काढून सुरक्षित गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला

अमेरिका -इराणमधील युद्धाच्या तयारीच्या चर्चांदरम्यान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १५ टक्के जागतिक टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यापासून सोनं आणि चांदीच्या सुरक्षित गुंतवणुकीची मागणी आणखी वाढली आहे. आज सकाळी ९.०५ च्या सुमारास एमसीएक्सवर एप्रिल गोल्ड फ्यूचर्स १,६०,६०० रुपया प्रति तोळ्यावर गेले. जे शुक्रवारी मार्केट बंद होतानाच्या भावापेक्षा ३,७०० रुपयांनी म्हणजेच २.४ टक्क्यांनी ज्यास्त आहे.

तर चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा करार ६ टक्के म्हणजेच १५,२०० रुपयांनी वाढून प्रति किलो २,६८,१२० रुपयांच्या आसपास पोहचला आहे. COMEX वर सोन्याचा भावही २ टक्के म्हणजेच १०९ डॉलरने वाढून प्रति औंस ५,१८९.६० रुपयांच्या आसपास झाला आहे. चांदीचा भावही ५.१६ टक्के म्हणजेच ६ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ८७.५०५ रुपयांच्या आसपास पोहचला आहे.

Gold-Silver Price: एका झटक्यात चांदी ₹ १५२०० वाढली, सोन्याच्या दरातही मोठी वाढ; नेमकं कारण काय?
Gold Mangalsutra Designs: सोन्याचे मंगळसूत्र बनवताय? हे आहेत ट्रेडिंग डिझाईन्सचे 5 लॉकेट

अमेरिका-इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक शेअर बाजारांवर मोठा परिणाम होत आहे. हे गुरुवारी दिसून आले जेव्हा भारतीय बेंचमार्क इंडेक्सवर प्रचंड विक्रीचा दबाव आला. शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इशारा दिला की, जर इराणने अणुकरारावर निष्पक्ष वाटाघाटी करण्यात अपयशी ठरले तर युद्ध भडकू शकते.

यानंतर मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेच्या सैन्यांना मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले. यामध्ये १३ युद्धनौका समावेश आहे. ज्यात विमानवाहू युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन आणि फ्रिगेट डेस्ट्रॉयरचा समावेश आहे. शिवाय, जगातील सर्वात धोकादायक आण्विक विमानवाहू युद्धनौका, यूएसएस गेराल्ड आर. फोर्डला भू भूमध्य समुद्रात प्रवेश करताना स्पॉट केले आहे. अमेरिकेने मध्य पूर्वेत डझनभर लढाऊ विमाने देखील तैनात केली आहेत.

Gold-Silver Price: एका झटक्यात चांदी ₹ १५२०० वाढली, सोन्याच्या दरातही मोठी वाढ; नेमकं कारण काय?
Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा तेजीत; 1 तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

दरम्यान, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांनी लावलेल्या जगभरातील कराला बेकायदेशीर घोषित केले. त्यानंतर ट्रम्प यांनी सर्व देशांमधून होणाऱ्या आयातीवर १० टक्के टॅरिफ लादण्याच्या कागदपत्रांवर सही केली. त्यानंतर शनिवारी त्यांनी अचानक कर १५ टक्केपर्यंत वाढवला. यामुळे जागतिक व्यापारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या तणावपूर्ण वातावरणात, लोक शेअर बाजारातून पैसे काढून ते सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीत गुंतवत आहेत. त्यामुळेच सोनं आणि चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Gold-Silver Price: एका झटक्यात चांदी ₹ १५२०० वाढली, सोन्याच्या दरातही मोठी वाढ; नेमकं कारण काय?
Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला, १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची वाढ; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com