अमेरिका- इराणमध्ये पुन्हा युध्दाची ठिणगी? अमेरिकेने दिली 'बंकर बॉम्ब'ची ऑर्डर

America Iran Conflict: जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे...अमेरिकेनं बंकर बॉम्बची ऑर्डर देत.. इराणची झोप उडवलीय... आता अमेरिका आणि इराणमधील संघर्ष कसा आणि कधी पेटणार?
A U.S. B-2 Spirit stealth bomber capable of carrying GBU-57 bunker buster bombs amid rising tensions with Iran.
A U.S. B-2 Spirit stealth bomber capable of carrying GBU-57 bunker buster bombs amid rising tensions with Iran.Saam Tv
Published On

अमेरिका- इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय.तो अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत अमेरिकेनं घेतलेला एक मोठा निर्णय... 21 जून 2025 ला 'ऑपरेशन मिडनाईट हॅमर'च्या माध्यमातून इराणच्या अणुकेंद्रांना लक्ष्य केल्यानंतर अमेरिकेनं पुन्हा एकदा जगातील विध्वसंक अशा GBU- 57 बंकर बॉम्बची मोठी ऑर्डर दिलीय...जमिनीच्या शेकडो फूट खाली घुसून शत्रूचा निपातः करण्याची क्षमता असलेल्या या बॉम्बनं इराणची कशी झोप उडालीय...

57 बॉम्बचं महत्त्वं?

बॉम्बचा साठा पुन्हा भरण्यासाठी अमेरिकन हवाई दलाने बोईंग कंपनीला नवीन कंत्राट दिलं

GBU-57 हा अमेरिकेचा सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर बॉम्ब

बॉम्बचं वजन - 14 हजार किलोग्रँम

200 फूट जमिनीखाली घुसून हल्ल्याची क्षमता

शत्रूची बंकर उद्धवस्त करण्यास सक्षम

बोईंग कंपनीला दिलेल्या बंकर बॉम्बच्या कंत्राटामुळे इराणची झोप उडालीय. इस्रायली माध्यमांनुसार, अमेरिकेनं या बॉम्बची संख्या आणि डिलिव्हरीची तारीख गुप्त ठेवली असली तरी, ही ऑर्डर म्हणजे इराणवरील दुसऱ्या संभाव्य हल्ल्याची पूर्वतयारी मानली जातेय.. मुळात बंकर बॉम्बच्या माध्यमातून अमेरिका- इराणमधील संघर्ष कसा वाढणार पाहूयात..

बॉम्बच्या ऑर्डरमुळे इराणवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न

अण्वस्त्र कार्यक्रम थांबवण्याचा थेट इशारा

अमेरिका - इस्रायल एकत्र येऊन इराणच्या घेराबंदीचा प्रयत्न

अमेरिकेनं हल्ला केल्यास चीन, रशिया वादात उडी घेण्याची शक्यता

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर विध्वसंक अशा महायुद्धाचा धोका

मुळात B-2 स्पिरिट या अदृश्य बॉम्बर विमानातून जेव्हा हा बॉम्ब टाकला जातो, तेव्हा शत्रूला सावध व्हायलाही वेळ मिळत नाही. त्यामुळे इराण अमेरिकेच्या या कारवायांना कसा रोखणार? अमेरिकेच्या भूमिकेमुळे आखाती देशांमधील शांतता पुन्हा भंग पावणार का? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com