Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today : खरेदीआधी वाचा सोन्याचे ताजे दर, २२k, २४k गोल्ड प्रति तोळा किती स्वस्त? वाचा एका क्लिकवर..

Gold rate today in Mumbai pune : आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचे भाव स्थिर आहेत.

Namdeo Kumbhar

today gold rate 22K and 24K per tola in Mumbai Pune Jalgaon : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण सोन्याच्या किमतीत होणाऱ्या सततच्या दरवाढीला आज लगाम बसला आहे. आजच्या सराफा बाजारात सोन्याचे दर किती राहतील, याकडे खरेदीदार आणि गुंतवणूकदाराच्या नजरा होत्या. लग्नसराईमुळे राज्यात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि वाढत्या मागणीमुळे सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांकाच्या जवळ पोहोचले आहेत. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत कोणताही बदल झाला नसल्याचे दिसलेय. आज २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याच्या दरात एक रुपयाचीही वाढ झालेली नाही.

कमकुवत डॉलर आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा यामुळेही सोन्याच्या तेजीला चालना मिळाली. goodreturns संकेतस्थळानुसार, सोमवारचेच दर आजही कायम आहेत. वाढत्या महागाईच्या काळात भाव स्थिर राहिल्याने खरेदीदारांना थोडा दिलासा मिळाला आहे. आज भारतात सोन्याचा भाव २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम १६,१९५ रुपये, २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम १४,८४५ रुपये आणि १८ कॅरेट सोन्यासाठी १२,१४६ रुपये प्रति ग्रॅम आहे.

२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,६२,७१० रुपये इतका आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,४९,१५० रुपयांवर स्थिर आहे.

१८ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा१,२२,०३० रुपये आहे.

तुमच्या शहरात सोन्याची किंमत किती?

Gold price today.jpg

खरेदीदारांसाठी चांगली संधी?

सोन्याचे दर गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक उच्चांकावर आहेत. आज किमती न वाढल्यामुळे जे ग्राहक दागिने खरेदीचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी आजचे दर महत्त्वाचे ठरतील. तथापि, हे दर जीएसटी (GST) आणि मेकिंग चार्जेस विरहित आहेत, याची नोंद घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केडीएमसीत हालचालींना वेग; भाजपचे ५० नगरसेवक कोकण भवनाकडे होणार रवाना

Pune-Solapur Highway: पुणे-सोलापूर प्रवास सुसाट होणार, ६ उड्डाणपूल अन् 'या' ठिकाणी होणार सर्व्हिस रोड, वाचा मास्टरप्लॅन

Sabudana Papad : घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि क्रिस्पी साबुदाणा पापड, लगेच नोट करा रेसिपी

Pune News: सासू सरपंच, सासरे मुख्याध्यापक; चौधरी कुटुंबात सुनेचा छळ, गर्भपातही केला; त्रासलेल्या दिप्तीनं आयुष्य संपवलं

Border 2 Collection : पैसाच पैसा; प्रजासत्ताक दिनाला 'बॉर्डर 2' ची बक्कळ कमाई, 'पुष्पा', 'जवान', 'टाइगर'लाही पछाडलं- बनवला जबरदस्त रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT