ZP election : 'शिवसैनिक म्हणून घ्यायला लाज वाटते', शिंदेसेनेच्या उमेदवाराला भाजपकडून AB फॉर्म, कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी

Viral audio clip exposes AB form controversy in Dharashiv : संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील व त्यांच्या पुत्राकडे एबी फॉर्म दिल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam Tv
Published On

बालाजी सुरवसे, धाराशिव प्रतिनिधी

Shiv Sena workers accuse BJP MLA of distributing AB forms : जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे एबी फॉर्म भाजप आमदाराच्या हातून वाटप करण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. शिवसेना पदाधिकार्‍यांनी राजन साळवींना याबाबत जाब विचारलाय, याची ऑडिओ क्लिप समोर आली. शिवसैनिक म्हणून घ्यायला लाज वाटायला लागली, आमच्या सोबत बैठका घेतात आणि राणा पाटलाचं मुलगा आम्हाला एबी फॉर्म देतो लाज वाटते, असा रोष शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. (Shiv Sena AB form controversy)

संपर्कप्रमुख म्हणून तुम्ही सर्व निर्णय घ्यायला हवे, शिवसेना पदाधिकारी अविनाश खापे यांनी संपर्कप्रमुख राजन साळवींना खडसावल्याची ऑडिओ क्लिप सध्या धाराशिव आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजकारण सोडून शिवसैनिक घरात बसतील. विधानसभेला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून तिकडे दिलं, चार महिन्यात काय चमत्कार झाला..? असाही सवाल उपस्थित केलाय. Dharashiv Zilla Parishad election news

शिवसेनेचे एबी फॉर्म राणा पाटलांच्या मुलाच्या हातात जातात कसे..? मी तानाजी सावंत यांचा कार्यकर्ता नाही, मात्र धाराशिवमध्ये सावंतांच्या हातात सूत्र दिली तर चालेल, असेही कार्यकर्ता म्हणत आहे. मी शिंदे साहेबांचा आणि श्रीकांत शिंदे साहेबांचा कार्यकर्ता, तानाजी सावंत यांच्या लाभाचा कार्यकर्ता नाही, मात्र धाराशिवमध्ये शिवसेनेसाठी तानाजी सावंत गरजेचे आहेत, असेही त्याने म्हटलेय.

Eknath Shinde
काँग्रेस खासदाराच्या पुतण्याने धाडधाड गोळ्या झाडत बायकोची हत्या केली, त्यानंतर आत्महत्या केली

कार्यकर्ते ढसाढसा रडत आहेत, डोळ्यातून पाणी येतंय, आम्ही जीव जळला गद्दर म्हणून लोक अंगावर येत होते, आम्ही लोकात अंगावर जाऊन काम केलं. निवडणुकीत अशी स्थिती पक्षात लोकशाही राहिली नाही,हुकूमशाही सुरू झाली;राणा पाटलांच्या बळाला तुम्ही बळी पडला, असे म्हणत जाब विचारलाय. राणा पाटलांनी आमचा गेम केला हे जाहीर करा,अपक्ष पुरस्कृत आघाडी म्हणून आम्ही लढतो, अशी खदखद कार्यकर्त्याने व्यक्त केल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये दिसतेय.

Eknath Shinde
Pune news : पुण्यात राडा! नगरसेविकेच्या भावाला बेदम मारहाण, भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत धाराशिव जिल्हा परिषद तिकीट वाटपावरून मोठा गोंधळ सुरू असतानाच आता सोशल मिडीयावर युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे व शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या ऑडिओ क्लिपमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यावर गंभीर आरोप केले. राजन साळवी यांनी शिवसेनेची तिकीट भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्याकडे नेहून दिली आहेत. तेच त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत उभा करत असल्याचा आरोप राजन साळवी यांच्यावर केला. राजन साळवी यांनीही मी तिकीट त्यांच्याकडे दिली असल्याची कबुली या कार्यकर्त्यांना बोलताना दिली आहे. या अगोदर राजन साळवी यांनी तिकीट वाटपात गोंधळ घालत भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मनावरच धाराशिव जिल्ह्यातील तिकीट विकल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता, त्यात तिकीट वाटपावरून धाराशिव कळंब तुळजापूर या तीन तालुक्यात मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. त्यातच आता ही ऑडिओ क्लिप व्हायर झाली.

Eknath Shinde
Toll Tax Relief : सरकारने टोल टॅक्स नियम बदलले, ७०% पर्यंत बंपर सूट देत आहे; जाणून घ्या कुठे मिळेल फायदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com