WhatsApp paid version update : व्हॉट्सॲप वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे संकेत मिळत आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलंय. मेटा कंपनीकडून व्हॉट्सॲपसाठी 'सबस्क्रिप्शन प्लॅन' आणण्याची तयारी केली जात आहे. पण हा सबस्क्रिप्शन प्लॅन सर्वांसाठी नाही, तर प्रामुख्याने व्हॉट्सॲप बिझनेस युजर्संसाठी फक्त शुल्क मोजावे लागू शकता. पण भविष्यात प्रत्येक व्हॉट्सॲपच्या युजर्ससाठी पैसे मोजावेच लागू शकता. सोशल मीडियावर मेटा कंपनीच्या व्हॉट्सॲप सबस्क्रिप्शन मॉडेलची चर्चा सुरू आहे. (WhatsApp paid subscription plan for business users)
भारतासह जगात व्हॉट्सअॅपचे कोट्यवधी युजर्स मोफत मेसेजिंग सेवेचा लाभ घेतात. पण आता याच सेवेसाठी पैसे मोजावे लागेल, असे बोलले जातेय. मेटा 'पेड' मॉडेलवर काम करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. मेटा कंपनी व्हॉट्सॲपच्या अपडेटेड फीचर्ससाठी लवकरच सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच करू शकते, ज्यामुळे युजर्समध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा बदल प्रामुख्याने व्हॉट्सॲप बिझनेस युजर्सना डोळ्यासमोर ठेवून केला जात आहे. यामध्ये व्यवसायांना अधिक उपकरणे जोडणे आणि प्रगत मॅनेजमेंट टूल्स वापरण्यासाठी शुल्क आकारले जाईल. जरी सामान्य युजर्ससाठी मूलभूत सेवा मोफत राहण्याची शक्यता असली, तरी जाहिरातीमुक्त अनुभवासाठी भविष्यात सर्वांनाच खिशाला कात्री लावावी लागण्याची चिन्हे आहेत. पेड सेवेबाबत मेटाकडून अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नाही. पण व्हॉट्सॲपच्या या संभाव्य धोरणामुळे जगभरातील करोडो युजर्सचे लक्ष याकडे लागले आहे.
गेल्या वर्षी मेटाने व्हॉट्सअॅप स्टेटस आणि चॅनेलमध्ये जाहिराती दाखवण्यास सुरुवात केली. कंपनीच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. आधी जाहिरात मुक्त अनुभव घेणाऱ्या व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना हा बदल रूचला नाही. युजर्सकडून विरोध असतानाही मेटाने आपला निर्णय कायम ठेवला. आता मेटा कंपनी पेड व्हॉट्सपचा विचार करत आहे. त्यामुळे भविष्यात वापरकर्त्यांना जाहिरातमुक्त व्हॉट्सअॅप वापरायचे असेल तर पैसे मोजावे लागतील. व्हॉट्सअॅपच्या 2.26.3.9 व्हर्जनमध्ये जाहिरातीचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळेच मेटा कंपनी नवीन सबस्क्रिप्शन प्लॅनवर काम करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
व्हॉट्सअॅपच्या पेड सबस्क्रिप्शन प्लॅनची सध्याची किंमत किती असेल, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्याशिवाय मेटाकडून पेड सर्व्हिस कधी सुरू केली जाणार, हेही समोर आलेले नाही. रिपोर्ट्सनुसार, फक्त जाहिरात नको असेल तरच भविष्यात युजर्सला पैसे मोजावे लागतील. त्यासाठी खास प्रिमियम असतील. एक्सप्रमाणेच मासिक, वार्षिक प्लॅन उपलब्ध केले जाऊ शकतात. आधी बिझनेस व्हॉट्सअॅप युजर्ससाठी पेडची सेवा सुरू होईल. त्यानंतर हळू हळू प्रत्येक युजर्ससाठी प्रिमियम प्लान तयार केले जाऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.