Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी खुशखबर! १० तोळा सोन्याचे दर २८०० रुपयांनी घसरले; वाचा सविस्तर

Gold Rate Today 1st November 2025: आज सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याचे दर आज घसरले आहेत. १० तोळ्यामागे २८०० रुपयांनी घसरले आहेत.

Siddhi Hande

सोन्याचे दर आज पुन्हा घसरले

सोन्याच्या दरात १० तोळ्यामागे २८०० रुपयांची घसरण

मागील अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण

दिवाळीपासून सोन्याचे दर सलग घसरताना दिसत आहेत. आज पुन्हा सोन्याचे दर घसरले आहे. काल सोन्याचे दर वाढले होते त्यानंतर आज पुन्हा किंमती कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरातील ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून लग्नाचे मूहूर्त सुरु होणार आहे. लग्नसमारंभात दागिने बनवले जातात. दरम्यान, त्यामुळे सोन्याचे दर कमी व्हावेत, असं सर्वांना वाटत होते. आज हे दर पुन्हा घसरले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर आधी दर जाणून घ्या.

सोन्याचे आजचे दर (Gold Rate Today)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २८० रुपयांनी घसरले आहेत. आज सोन्याच्या किंमती १,२३,००० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९८,४०० रुपये आहेत. हे दर २२४ रुपयांनी कमी झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २,८०० रुपयांनी कमी झाले आहेत. हे दर सध्या १२,३०,००० रुपये आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,१२,७५० रुपये आहेत. हे दर २५० रुपयांनी घसरले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर २०० रुपयांनी घसरले असून सध्या ९०,२०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे २,५०० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर ११,२७,५०० आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २१० रुपयांनी घसरले आहेत. हे दर ९२,२५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १६८ रुपयांनी घसरले असून ते सध्या ७३,८०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २१०० रपयांनी घसरले असून ते ९,२२,५०० झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडमध्ये माजी आमदाराच्या घरावर दगडफेक, गाड्यांच्या काचा फोडल्या, शेकडो पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल|VIDEO

Maharashtra Nagar Parishad Live : सांगलीत पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन, भाजपविरोधात आक्रमक

Signs Of Heart Failure: मानेची ही एक टेस्ट सांगेल हार्ट अटॅक येणारे; अवघ्या २० मिनिटात कळेल धोका किती?

Satellite Based Toll System: नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला स्थगिती; आता सॅटेलाइटद्वारे टोल वसुली होणार नाही

SCROLL FOR NEXT