

सोन्याचे दर उच्चांक गाठणार
बाबा वेंगाची भविष्यवाणी
२०२६ मध्ये सोन्याचे दर नवा रेकॉर्ड बनवणार
सोन्याच्या किंमती गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वाढत आहेत. सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने ते सर्वसामान्यांना परवडणारे नाहीये. दिवाळीत सोन्याचे दर घसरले होते. दरम्यान, आता पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. दरम्यान, आता २०२६ मघ्ये सोन्याचे दर वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Gold Rate Prediction)
२०२५ अखेरपर्यंत सोन्याचे दर काही कमी होणार नाहीत. त्यानंतर २०२६ मध्येही सोन्याचे दर असेच वाढत जातील, अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली आहे. जागतिक बाजारात मंदी असणार आहे त्यामुळे सोन्याचे दर उच्चांक गाठणार आहेत.त्यामुळे सोन्याचे दर १ लाख ५० हजारांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.
बाबा वेंगाची भविष्यवाणी (Baba Vanga Prediction)
बाबा वेंगा हे नेहमीच भविष्यवाणी करत असतात. यातील अनेक भविष्यवाणी खरी होतानादेखील दिसतात. त्यांनी आता सोन्याच्या दरात वाढ होणार असल्याचे सांगितले आहे. २०२६ मध्ये जागतिक बाजारपेठेत मंदी येणार आहे. यामुळे सोनं महागणार आहे. २०२६ मध्ये सोन्याच्या किंमती नवीन रेकॉर्ड बनवणार आहे.
तज्ज्ञांनुसार, सोन्याचे दर २५ ते ४० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढच्या वर्षी सोन्याचे दर १,६२,५०० ते १,८२,००० रुपये प्रति तोळा असणार आहेत. यामुळे सोन्याचे दर नवा रेकॉर्ड बनवणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी सोनं खरेदी करणे अजून कठीण होणार आहे. लवकरच सोन्याचे दर २ लाखांचा आकडा पार करतील, असंही सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.