Gold Rate Today: भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; वाचा २२ अन् २४ कॅरटचे दर

Gold Rate Today 24th October 2025: भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. आज सोन्याच्या दरात १० तोळ्यामागे ३८०० रुपयांची वाढ झाली आहे.
Today's Gold Rate
Today's Gold RateSaam Tv
Published On

भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत होती. दिवाळीत मात्र सोन्याचे दर घसरले होते. त्यानंतर आज पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याच्या दरात प्रति तोळामागे ३८० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर वाढल्याने मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.

Today's Gold Rate
EPFO 5 Rule News : आता पेन्शन प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, EPFO चे हे ५ नवे नियम माहिती आहेत का ?

दिवाळीत सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र, हे दर आता पुन्हा वाढताना दिसत आहे. सोन्याचे दर सध्या १ लाख २५ हजार रुपये प्रति तोळा आहे. त्यामुळे हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीये.दरम्यान, सोन्याचे दर वाढत जरी असले तरीही ते खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होती. आजचे सोन्याचे दर वाचा.

२४ कॅरेट सोन्याचे दर

आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३८० रुपयांनी वाढ झाली आहे. आज हे दर १, २५,४६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३०४ रुपयांनी वाढले आहेत. हे दर सध्या १,००,३६४ रुपये आहेत. १० तोळा सोन्याच्या दरात ३८०० रुपयांनी वाढ झाली आहे.

२२ कॅरेटचे दर

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ३५० रुपयांनी वाढले आहेत. हे दर सध्या १,१५,००० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे द ९२,००० रुपये आहेत. हे दर ३५० २८० रुपयांनी वाढले हेत. १० तोळा सोन्याचे दर ३५०० रुपयांनी वाढले आहेत हे दर सध्या ११,५०,००० रुपये आहेत.

Today's Gold Rate
Governemnt Job: बेरोजगारांना मोठा दिलासा! १० हजार ३०९ जणांना शासकीय नोकरी | VIDEO

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर २८० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ९४,०९० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर २२४ रुपयांनी वाढले आहेत. हे दर ७५,२७२ रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर २८०० रुपयांनी वाढले असून दर ९,४०,००० रुपये आहेत.

Today's Gold Rate
Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com