Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

Gold and Silver Price: आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर होऊ शकतो. एमसीएक्सवर कमोडिटी मार्केट उघडेल तेव्हा गुंतवणूकदार सोने-चांदीवर लक्ष केंद्रित करतील.
Gold and Silver  Price
Gold and silver prices are set for a major fall in the Indian market after a record decline in global rates.saam tv
Published On
Summary
  • गुंतवणुकीसाठी आनंदाची बातमी

  • आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे.

  • किमती कमी झाल्याने भारतीय बाजारात गुरुवारी मोठी घट होण्याची शक्यता.

सोने-चांदीच्या दराने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर या धातूंच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली. सोन्याच्या दरात अजून घसरण होऊ शकते. मंगळवारी जागतिक बाजारात एका दिवसासाठी सोने-चांदीच्या किमतींमध्ये विक्रमी घसरण झाली होती. आता ही घसरण उद्या गुरुवार २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१७ ऑक्टोबर २०२५ रोजी भारतीय एमसीएक्स बाजारात सोन्या-चांदीच्या किमती विक्रमी घसरल्या होत्या. तेव्हा चांदी प्रति किलो सुमारे २०,००० रुपये आणि सोन्या प्रति १० ग्रॅम सुमारे ४,००० रुपये कमी झाली आहे. दरम्यान ही घसरण आणखी मोठी असू शकते. कारण गेल्या दोन दिवसांपासून जागतिक स्तरावर सोने आणि चांदीच्या किमती घसरत आहेत. सणासुदीच्या हंगामामुळे एमसीएक्स बंद आहे. त्यामुळे या धातूंच्या किमतीमध्ये आणखी घसरण होणं अपेक्षित आहे.

१२ वर्षातील मोठी घसरण

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. इंट्राडे दरम्यान सोन्याचे दर ६.३ टक्क्यांनी घसरले होते. चांदीचे दर इंट्राडेमध्ये ७.१ टक्क्यांनी घसरले होते. ही १२ वर्षातील सर्वात मोठी घसरण होती असं म्हटलं जात आहे. दरम्यान बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात पाच वर्षातील मोठी घसरण पाहायला मिळाली. व्यापारी स्तरावर मोठा नफा वसूल केला जातोय, त्यामुळे ही घसरण झाली होतेय.

Gold and Silver  Price
Gold price : अवघ्या ६ मिनिटात सोनं ७,७०० रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या दरात वर्षभरातील सर्वात मोठी घसरण

लंडन ट्रेडिंगमध्ये सोन्याचे दर ४१०० डॉलर प्रति औंसच्या खाली आले आहेत. मंगळवारी ही घसरण ५ टक्क्यांची होती. चांदीच्या दरात अशाच प्रकारची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं बुधवारी ४०९६ डॉलर प्रति औंसवर आले आहेत. तर चांदीचे दर 48 डॉलरवर आले आहेत.

Gold and Silver  Price
सुवर्णनगरीत सोन्याचे दर घसरले; दिवाळी पाडव्याला जोडीदारासाठी घ्या गिफ्ट ; पाहा आजचा लेटेस्ट भाव

दिवाळीनंतर मोठी घसरण होणार

तज्ज्ञांच्या मते, दिवाळी सणाच्या हंगामानंतर ही घसरण झाली आहे. जेव्हा भारतात सोन्याची खरेदी शिखरावर असते. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांच्या मते, सोन्याच्या किमतीत एकतर्फी तेजी दिसून आलीय. गेल्या चार महिन्यांत ते प्रति औंस सुमारे डॉलर ३,३०० वरून डॉलक ४,४०० प्रति औंस झाले आहे, त्यामुळे घसरण अपरिहार्य होती. हा काळ उलटफेरपेक्षा ग्राहकांच्या संयमाचा आहे.

जर तुम्ही सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुम्ही घसरणीवर खरेदी करू शकता किंवा धीर धरू शकता. भारतात सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम १.३ लाख रुपयांवरून सुमारे १.२८ लाख रुपयांपर्यंत घसरलेत. तर चांदीच्या दरात शुक्रवारच्या दिवसापासून सुमारे १२% नी घसरण झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com