Gold Rate Today: दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोनं ₹१२०० रुपयांनी महागलं, वाचा २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर

Gold Rate Today 1st October 2025: आज सोन्याचे दर वाढले आहेत. दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोन्याच्या दरात १२०० रुपयांची वाढ झाली आहे. वाचा तुमच्या शहरातील आजचे भाव किती?
Today Gold Rate
Today Gold RateSaam Tv
Published On

आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. उद्या देशभरात दसरा साजरा केला जातो. दसऱ्याच्या शूभ मूहूर्तावर अनेकजण सोने खरेदी करतात. परंतु यंदा सोने खरेदीसाठी फार काही गर्दी होणार नसल्याचे दिसत आहे. यंदा सोन्याचे दर सलग वाढताना दिसत आहे. सोन्याच्या दरात आजदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला जोरदार फटका बसणार आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १२०० रुपयांनी महागले आहेत.

Today Gold Rate
Gold Price : दसऱ्याच्या आधीच सुवर्ण झळाळी; सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, एकाच दिवसात १५०० रुपयांनी वाढ

दसरा हा साडेतीन मूहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे दरवर्षी सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी होते. दरम्यान, आता यावर्षी सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे तुलनेने कमी गर्दी असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोन्याचे दर वाढले

आज दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. प्रति तोळा सोन्याचे दर १,१८,६४० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात ९६० रुपयांनी वाढ झाली असून हे दर ९४,९१२ रुपये आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १२,००० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ११,८६,४०० झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर १,१०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,०८,७५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८७,००० रुपये आहेत. या दरात ८८० रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळ्याचे दर १०,८७,५०० रुपये झाले आहेत. हे दर ११,००० रुपयांनी वाढले आहेत.

Today Gold Rate
Today Gold Rate: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला! १० तोळ्यामागे १२६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात ९०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर ८८,९८० रुपये झाले आहेत. ८ कॅरेट सोन्याचे दर ७२० रुपयांनी वाढले असून याची किंमत ७१,१८४ आहे.

Today Gold Rate
Gold Price : दसऱ्याच्या आधीच सुवर्ण झळाळी; सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, एकाच दिवसात १५०० रुपयांनी वाढ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com